आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोग्य:नियमित आणि योग्य रीतीने हात धुण्यामुळे दरवर्षी 10 लाख लोकांचे जीव वाचू शकतात

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हात धुणे : सध्या कोरोनापासून बचावाच्या सर्वांत प्रभावी उपायांपैकी हा एक आहे

ग्लोबल हँड वॉशिंग डे नुकताच जगभरात साजरा करण्यात आला. कोरोना इन्फेक्शनच्या या काळात लोकांना हाताच्या स्वच्छतेविषयी सांगणे एखाद्या उपचारापेक्षा कमी नाही. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व जगभरात आणखीनच वाढले आहे. अमेरिकन जर्नल ऑफ इन्फेक्शन कंट्रोलच्या अभ्यासानुसार, घरी असतानाही वारंवार हात धुण्यामुळे कुटुंबात संक्रमणाचा धोका कमी होतो. घरामध्ये दाराचे हँडल, बाथरूमचे नळ आणि फ्लश हँडल हे सर्व संक्रमणाचा मुख्य स्त्रोत आहेत. अशा परिस्थितीत, त्यांच्या साफ सफाईकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. त्यांना स्पर्श केल्यानंतर हात धुतले पाहिजेत. एका अभ्यासानुसार, वेगवेगळ्या प्रकारचे संक्रमण फक्त न फक्त हातामुळे पसरतात. ग्लोबल हँड वॉशिंग ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार, हाताच्या १५ सेमी भागात सुमारे १५०० बॅक्टेरिया असतात. लोकांनी जर नियमितपणे आणि योग्य प्रकारे हात धुतले तर दरवर्षी सुमारे १० लाख लोकांचे जीव वाचू शकतात.

हाताची स्वच्छता आणि हातामुळे पसरणाऱ्या संक्रमणांबद्दल...
हँड सॅनिटायझर खरोखरच ९९% विषाणू आणि जंतू नष्ट करतो का?

जनरल सायन्स ट्रान्सलेशनल मेडिसिनमध्ये २०१८ मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, संशोधकांनी मेलबर्नमधील २ रुग्णालयांमधील १३९ बॅक्टेरियातील नमुन्यांचे विश्लेषण केले. त्यात बरेच जंतू जिवंत आढळले होते. अल्कोहोलिक हँड रब किंवा सॅनिटायझर्सचा वापर करुनही ते नष्ट झाले नव्हते. तथापि, हॉस्पिटलमध्ये आढळणाऱ्या बॅक्टेरियांबाबत हे लागू होते, असे संशोधकांनी सांगितले. इतर जीवाणूंसाठी अभ्यासाची गरज आहे. अशा परिस्थितीत हात स्वच्छ धुण्यासाठी साबण आणि पाणी हे चांगले पर्याय असल्याचे डॉक्टर मानतात.

२०२३ पर्यंत हँड सॅनिटायझरचा बाजार १२८६७ कोटींचा होईल
अलाइड मार्केट रिसर्चने ‘हँड सॅनिटायझर मार्केट बाय प्रॉडक्ट, डिस्ट्रीब्यूशन चॅनल अँड अँड यूजः ग्लोबल अपॉर्च्युनिटी अ‍ॅनालिसिस अँड इंडस्ट्री फोरकास्ट २०१७-२०२३’ या नावाने प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार २०१७ पर्यंत हॅन्ड सॅनिटायझरची जागतिक बाजारपेठ ६,७३६ कोटी रुपयांची होती. ती आता २०२३ पर्यंत १२८६७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

हात धुण्याशी संबंधित पाच महत्वपूर्ण तथ्ये
- हातातील एका छोट्या भागात जवळजवळ १५०० जीवाणूूू असतात
- नियमित हात धुतल्यामुळे श्वसनाशी संबंधित ५ आजारांपैकी एका आजारी व्यक्तीला वाचवता येते
- हात धुतल्यामुळे डायरियाशी संबंधित प्रत्येकी ३ पैकी १ आजारी व्यक्तीला वाचवता येते.
- नियमित हात धुतल्यामुळे दर वर्षी १० लाख लोकांचा मृत्यु रोखता येतो.

हातांद्वारे विषाणू शरीरात कसे जातात ?
- सूक्ष्मजंतू डोळे, नाक आणि तोंडातून शरीरात जातात.
- न धुतलेल्या हातावर असलेले जंतू हे अन्नपदार्थ आणि पेयातून संक्रमित होऊ शकतात. }हातातूनच दरवाजांचे हॅन्डल, फोन स्क्रीन, व्यायाम शाळेतील उपकरणे, पायऱ्या यांमध्येही विषाणू पसरू शकतात.
- मोठ्या प्रमाणात लोक हात न धुताच डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करतात.

स्रोत: ग्लोबल हैंडवॉशिंग ऑर्गेनाइजेशन

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser