आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आरोग्य :ऊर्जा वाढवण्यासाठी तांदळाचे पाणी उपयुक्त

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिजवलेल्या तांदळाचे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते

शिजवलेला भात तर आपण सगळेच खातो, पण कधी आपण या भाताचे पाणी (पेज) पिऊन बघितले आहे का? शिजवलेल्या तांदळाचे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. तांदळाचे पाणी पिण्याचे ५ आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊया...


. तांदूळ शिजवताना त्यातील वरचे पाणी पिण्यासाठी वापरावे. हे आपल्या शरीरासाठी ऊर्जा मिळविण्याचा चांगला स्रोत आहे. जे कर्बोदके(कार्बोहायड्रेट्स) ने परिपूर्ण आहे. दररोज सकाळी हे पाणी प्यायल्यास आपली ऊर्जा वाढते. ऊर्जा वाढवण्यासाठी हा सोपा उपाय आहे.


२. तांदळाचे पाणी फायबरने पुरेपूर असते. हे आपल्या मेटाबॉलिझमला वाढविण्यात मदत करतात. पचन तंत्र सुधारून चांगल्या जिवाणूंना सक्रिय करण्याचे काम करतात. जेणेकरून आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास उद्भवत नाही.


. मुलांना किंवा मोठ्यांनासुद्धा जुलाब लागल्यावर तांदळाचे पाणी देणे फायदेशीर असते. त्रासाच्या सुरुवातीस तांदळाच्या पाण्याचे सेवन केल्याने आपण गंभीर दुष्परिणामांपासून वाचू शकता.


४. व्हायरल इन्फेक्शन किंवा ताप आला असल्यास तांदळाचे पाणी प्यायल्याने आपल्या शरीरात पाण्याची कमतरता होत नाही आणि त्याचबरोबर आपल्या शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात. जेणेकरून आपल्याला लवकर बरे होण्यास मदत मिळते.


५. शरीरात पाण्याची कमी डिहायड्रेशन (निर्जलीकरण)च्या रूपात होते. विशेष करून हा त्रास उन्हाळ्यात जाणवतो. तांदळाचे पाणी आपल्या शरीरातील पाण्याच्या कमतरतेला संतुलित करते.

0