आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायातून येणार वास क्षणात करा दूर:डेड स्कीन आणि घामाच्या बॅक्टेरियामुळे होतो ब्रोमोडोसिस, करा हे घरगुती उपाय

लेखक: भाग्य श्री सिंह17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पायांतून वास येणे ही एक सामान्य समस्या आहे. तळपायांना जास्त घाम येणे किंवा एकच स्कॉस वारंवार वापरल्यामळे पायांना घाण वास येतो. याने इम्प्रेशन देखील खराब होते. वैद्यकीय भाषेत पायातून येणाऱ्या दुर्गंधीला ब्रोमोडोसिस म्हणतात. डॉ जयंत ठाकुरिया, वरिष्ठ सल्लागार आणि युनिट हेड, अंतर्गत औषध आणि संधिवातशास्त्र, एकॉर्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फरीदाबाद हे असे का होते आणि या समस्येपासून मुक्त कसे व्हावे हे सांगत आहेत.

पायाच्या दुर्गंधीने आहात त्रस्त, जाणून घ्या असे का होते ?

पायात 125,000 घामाच्या ग्रंथी असतात. शरीराच्या इतर कोणत्याही भागापेक्षा तळपायांमध्ये प्रति चौरस सेंटीमीटर जास्त ग्रंथी असतात. या ग्रंथी दिवसभर पायामध्ये असतात ज्यामुळे शरीर थंड आणि त्वचा ओलसर राहते. घामाच्या असलेल्या ग्रंथी अर्धा पिंट घाम तयार करतात. अर्धा पिंट घाम म्हणजे दीड पाव (1 बिअर ग्लास).

याशिवाय पायांच्या स्किनमध्ये जास्त डेट स्किन असते. जेव्हा डेड स्किन आणि घाम येतो तेव्हा बॅक्टेरीया व फंगल वाढतात. म्हणून यामुळे पायाला दुर्गंधी येते. ब्रोमोडोसिसमुळे ऍथलीटमुळे पायांना फंगल इन्फेक्शन देखील होई शकते. ऍथलीटमुळे बोटांच्या दरम्यान किंवा तळपायावर खाज सुटते. पायावर फोड येतात आणि अंगठ्याची नखे जाड आणि फिकट रंगाची होतात.

प्रत्येक व्यक्तीच्या पायाला जास्त घाम येतो का?

प्रत्येकाच्या पायाला घाम येतो. पण टीनेएज आणि प्रेग्नेंसी दरम्यान पायांना जास्त घाम येतो. या दरम्यान, शरीरात असे हार्मोन्स तयार होतात, ज्यामुळे जास्त घाम येतो. जे लोक ऑफिसमध्ये दिवसभर शूज घालतात किंवा खूप तणावाखाली असतात, त्यांचे पाय अनेकदा घामाने ओले होतात.

पायाला वास येत असेल तर करा हे घरगुती उपाय

जर तुम्ही नियमितपणे पायांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेतली तर, या टिप्स तुमच्या पायाची दुर्गंधी कमी करण्यास मदत करू शकतात-

पायला करणे स्क्रबिंग आवश्यक

दिवसातून एकदा तरी पाय धुण्यासाठी सौम्य साबण आणि स्क्रब ब्रश वापरा. आंघोळ करताना पायांची स्वच्छताही करू शकता. धुतल्यानंतर पाय पूर्णपणे कोरडे करणे महत्वाचे आहे. बोटांच्या दरम्यान विशेष लक्ष द्या. बोटांमध्ये ओलावा नसावा. अन्यथा ओलेपणामुळे जीवाणू सहज वाढू शकतात.

नखांकडेही लक्ष द्या

पायाची नखे अनेकदा कोणाच्या लक्षात येत नाहीत. बोटांची नखे आठवड्यातून एकदा कापून घ्या जेणेकरून ते लहान असतील आणि त्यांच्या स्वच्छतेची देखील काळजी घ्या.

डेड स्किन काढा

डेड स्किन आणि घामामुळे पायांमध्ये बॅक्टेरीयाही वाढतात. ओले झाल्यावर त्वचा कोरडी आणि मऊ होते. ज्यामुळे बॅक्टेरीया वाढतात. व पायाची कोरडी त्वचा आणि डेड स्किन त्वचा फूट फाइलरने काढून टाका. आठवड्यातून एकदा ही प्रयोग करा

मोजे बदलण्यास विसरू नका

जर तुमच्या पायांना खूप घाम येत असेल किंवा तुम्ही उष्ण वातावरणात रहात असाल तर दिवसातून एकदा तरी मोजे नक्कीच बदलावे. व्यायाम केला तरी मोजे नियमित बदलले पाहिजेत. घाम शोषून घेणारे फॅब्रिकचे मोजे निवडा. नैसर्गिक फायबर किंवा स्पोर्ट्स सॉक्स वापरा, ते पायांसाठी चांगले असतात.

शूज बदला

उन्हाळ्यात बुटांच्या ऐवजी चपला घालाव्यात जेणेकरून पायात हवा जाईल. शूज घातले तर दोन शूज ठेवा. दररोज आपले शूज बदला जेणेकरून घाम पूर्णपणे सुकून जाईल. घामामुळे शूजमध्ये ओलावा राहिल्यास फंगल आणि बॅक्टेरीयाची वाढ होण्याची शक्यता असते.

रबिंग अल्कोहोल वापरा

कापसाच्या बॉलवर थोडेसे रबिंग अल्कोहोल लावा आणि दररोज रात्री तुमचे पाय स्वच्छ करण्यासाठी वापरा. यामुळे पाय पूर्णपणे कोरडे होतील. पण पायावरच्या कोणत्याही जखमेत किंवा घोट्याला भेगा पडलेल्या ठिकाणी लावू नका.

फूट स्प्रे किंवा फूट पावडर लावा

पायांना दररोज अँटीफंगल फूट स्प्रे किंवा औषधी पावडर लावा. शूजमध्ये औषधी डिओडोरंट इनसोल्स घाला.

दुर्गंधीपासून त्वरित मुक्त होण्यासाठी

पायाची दुर्गंधी लवकर कमी करायची असेल, तर पायांवर अँटीपर्सपिरंट किंवा डिओडोरंट स्प्रे लावा.

योग्य साबण वापरा

विविध अँटीफंगल्स आणि बॅक्टेरिया दूर ठेवण्यासाठी साबण वापरा. कोणता साबण तुमच्या पायांवर उत्तम काम करतो हे तपासा.

व्हिनेगर देखील समस्या सोडवू शकते

पायांचा घाणेरडा वास दूर करायचा असेल तर टबमध्ये कोमट पाणी घ्या. त्यात 1 चमचा लिस्टरिन किंवा व्हिनेगर घाला. त्यात 15-20 मिनिटे पाय भिजवा. त्यानंतर कॉटन टॉवेलने नीट पुसून घ्या. बोटांमधील जागा देखील कोरडी करा.

या फूट प्रोडक्ट्सचा वापर करा

सहसा हे घरगुती उपाय पायांची दुर्गंधी कमी करण्यास किंवा दूर करण्यास मदत करतील. परंतु जर घरगुती उपचार ब्रोमोडोसिस कमी करू शकत नसतील किंवा घामाचा वास खूप तीव्र असेल आणि तुम्हाला त्याबद्दल लाज वाटत असेल आणि काळजी वाटत असेल तर डॉक्टरांना भेटा. तुमची समस्या समजून घेतल्यानंतर, जास्त घाम येणे (हायपरहायड्रोसिस) रोखण्यासाठी मजबूत अँटीपर्स्पिरंट किंवा असा कोणताही फूट साबण वापरण्याची शिफारस करतील.

लॅव्हेंडर तेलाने पायाचा वास कमी करा

सुगंधी लॅव्हेंडर तेल फंगलपासून आराम देते. यासोबतच हे बॅक्टेरिया मारून पायांची दुर्गंधी दूर करण्यात मदत करते.

काय आहे कृती

प्रथम पाणी त्वचेला सहन होईल इतके कोमट करा. हे पाणी टब किंवा बादलीत टाका. त्यात लॅव्हेंडर तेलाचे 10-15 थेंब घाला. या पाण्यात पाय 15-20 मिनिटे भिजवा. त्यानंतर टॉवेलने पुसून टाका. रात्री झोपण्यापूर्वी ही लॅव्हेंडर तेलाची रेसिपी वापरून पहा.

पायांना दुर्गंधी येऊ नये म्हणून काय करावे?

पायांवर नैसर्गिकरित्या काही चांगले बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया पायांना येणारा घाम कमी करण्यास मदत करतात. पण जास्त वेळ शूज घातल्याने पायात अधिक बॅक्टेरिया तयार होतात, त्यामुळे दुर्गंधी निर्माण होते.

बेकिंग सोडा देखील प्रभावी आहे

पायाची दुर्गंधी दूर करण्यासाठी बेकिंग सोडा देखील खूप प्रभावी आहे. यामुळे घामाचे पीएच मूल्य संतुलित होते आणि बॅक्टेरिया कमी होतात.

बेकिंग सोडासह पायांच्या दुर्गंधीपासून मुक्त कसे करावे

पाणी गरम करा. त्यात बेकिंग सोडा टाका. 1 लिटर पाण्यात 1 टीस्पून बेकिंग सोडा टाकला जाईल. या पाण्यात तुमचे पाय 20 मिनिटे ठेवा आणि नंतर कोरड्या टॉवेलने पुसून टाका. ही प्रयोग आठवडाभर करुन पाहा.

तुरटीही आहे गुणकारी

तुरटीमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात. हे बॅक्टेरिया आणि विषाणूंना दूर ठेवते. यामुळे घामाचा वास दूर होतो. पायाच्या दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी, 1 कॉफी मग पाणी हलके गरम करा. त्यात 1 टीस्पून तुरटी पावडर घाला. याने पाय चांगले धुवा. थोड्या वेळाने पाय कोरडे झाल्यावर तुरटी पावडर शिंपडा.

बातम्या आणखी आहेत...