आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनापासून बचाव:एअर प्युरिफायरमध्ये असलेल्या फिल्टरचे फेस मास्क सुरक्षित; घरातच तयार करा 3 थरांचे मास्क

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हॉल्व्ह असलेल्या एन-95 मास्कचा वापर न करण्याचा सरकारचा सल्ला, मास्कची सुरक्षितता ओळखा

जगभरात कोरोनापासून बचाव करण्यासाठी आणि तो वापरण्यास आरामदायी वाटावा, यासाठी मास्कची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न आहे. अमेरिकेत अनेक शास्त्रज्ञांनी तक्क्याच्या कपड्यापासून एअर फिल्टरला लागणाऱ्या हाय एफिशियन्सी पार्टिक्युलेट एअर फिल्टरपर्यंत (एचईपीए)मास्कसाठी तपासणी केली. अतिसूक्ष्म कणांना रोखण्यासाठी कोणते धागे सर्वात उपयुक्त ठरतात, याची तपासणी करण्यात आली. एचईपीए फिल्टर कोरोनास रोखण्यासाठी खूप चांगले असल्याचे आढळून आले. या संशोधनात गळ्यात घालण्यासाठी वापरले जाणारे स्कार्फ, रुमाल, कॉफी फिल्टर, थंडीत वापरले जाणारे पायजामे आदींच्या धाग्यांचीही तपासणी केली. स्कार्फ आणि पायजाम्याचे धागे सूक्ष्म कणांना रोखतात. पण तेही खूप सुरक्षित आहेत, असे नव्हे. त्यांचा स्कोअर खूप कमी आला.

अॅरोसालसंबंधी संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय अवॉर्ड जिंकणाऱ्या मिसोरी िवज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. यांग वांग यांनी यासाठी सूक्ष्म कणांना फिल्टरही करेल आणि मास्क वापरताना सहज श्वास घेऊ शकाल असा एकसारखा धागा असण्याची गरज आहे, असे म्हटले. इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. के. के. अग्रवाल यांनी तीन स्तरांचे मास्क उपयुक्त असल्याचे म्हटले आहे.

सुरक्षित फेस मास्कबाबत तीन महत्त्वाचे प्रश्न
1 एन-95 किती सुरक्षित?

तज्ञ एन-९५ ला उत्तम मेडिकल मास्क मानतात. तो ०.३ मायक्रॉनपर्यंतच्या छोट्या कणांना ९५% पर्यंत फिल्टर करतो. तर साधारण सर्जिकल मास्कमध्ये दुहेरी धागे वापरले जातात. ते ६० ते ८०%पर्यंत कण फिल्टर करतो.

2 मास्क कसे तयार कराल?
घरात तयार केलेल्या मास्कमध्ये क्विटिंग (तीन लेअर) फॅब्रिकपासून तयार केलेले मास्क सर्वात सुरक्षित आहेत. ते ७९% पर्यंत सूक्ष्म कणांना फिल्टर करतात. क्विटिंग कॉटन थोडे कडक असतात.

3 मास्क तपासण्याची पद्धत?
वेक फॉरेस्ट बॅप्टिस्ट हेल्थचे डॉ. स्कॉट सीगल यांनी सांगितले, मास्कला उजेडात धरा, जर मास्कच्या धाग्यातून प्रकाश आला तर कपडा चांगला नाही. जर वीण चांगली असेल तर प्रकाश येणार नाही. असे मास्क सुरक्षित आहेत.