आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्वासांच्या माध्यमातून एका वेळी शेकडो प्रकारचे वायू आपल्या शरीरातून बाहेर पडतात. अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या अभियंता क्रिस्टिना डेव्हिस यांच्या म्हणण्यानुसार, याला व्होलेटाइल ऑरगॅनिक कम्पाउंड किंवा व्हीओसी म्हटले जाते. हे आपले श्वसन, पचन आणि सेल्युलर मेटाबाॅलिझम तसेच इतर शारीरिक प्रकियांचे उपउत्पादन आहे. या व्होलेटाइल ऑरगॅनिक कम्पाउंडला आजार एकत्र करतात, त्यामुळे आपल्याला वेगवेगळे वास येऊ लागतात. या वासांच्या आधारे आजारांचा अंदाज बांधता येतो.
कशा प्रकारे आजारांशी संबंध आहे, हे जाणून घ्या
फळांचा वास : मधुमेह
श्वासांत फळांचा वा नेल पेंट रिमूव्हरसारखा वास आल्यास गंभीर मधुमेहाचा संकेत असू शकतो. याला किटोअॅसिडोसिस म्हटले जाते. शरीराला पुरेसे इन्सुलीन न मिळाल्यास ते ऊर्जेसाठी फॅटी अॅसिडचा उपयोग करते. ते अॅसिडिक किटोन्स तयार करते. त्यामुळेच श्वासांना असा वास येतो.
माशासारखा वास : किडनीसंबंधी
किडनी फेल्युअर म्हणजे एंड स्टेज रीनल डिसीजदरम्यान किडनी रक्तात टॉक्सिक केमिकल व टाकाऊ पदार्थ फिल्टर करू शकत नाही. यामुळे घातक विषद्रव्ये शरीराच्या सर्व अवयवांवर परिणाम करू लागतात. श्वसनयंत्रणेवर परिणाम झाल्यास तोंडाला असा वास येऊ लागतो.
अंड्याचा वास : पचनासंबंधी
आतड्यांत आढळणारे मायक्रोबायोटा सल्फरला तोडते. त्यातून अंड्यासारखा वायू निघतो. पोटातील आम्ल अॅसोफेगस किंवा पचनासंबंधी इतर कार्यासाठी वरच्या बाजूला जाते तेव्हा असे होते.
बुरशीचा वास : सायनस
कधी कधी मायक्रोबियल तयार होणे, त्यात वाढ होणे किंवा सायनसमध्ये संसर्ग झाल्यामुळे असा वास येतो. संसर्गामुळे नेहमी नाक वा सायनसमधून घशाच्या मागच्या भागापर्यंत श्लेष्म टपकते. हेच या वासाचे कारण आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.