आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुलनेमुळे मुलांत द्वेष, असुरक्षिततेची भावना:सामान्य असून सिब्लिंग रायव्हलरीचा  मुलांच्या आराेग्यावर परिणाम शक्य

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काेटाच्या जीएसटी विभागातील उपायुक्त रेणुका वर्मा यांचा दहा वर्षांचा मुलगा नाराज हाेऊन घरातून निघून गेला. त्याने एक पत्रही लिहिले. आई केवळ धाकट्या भावावर प्रेम करते. मला रागावते. नंतर हा मुलगा रतलाममध्ये सापडला. बाल मानसतज्ज्ञ अंशू गुप्ता म्हणाल्या, बहीण-भावांत आई-वडिलांच्या प्रेमावरून असुरक्षितता सामान्य आहे. परंतु येथून सिबिलंग रायव्हलरी सुरू होते. त्याबद्दल जाणून घेऊ.

{सिब्लिंग रायव्हलरी म्हणजे काय? मानसतज्ज्ञ आनंदिता राॅय म्हणाल्या, तुमचे माझ्यावर आता प्रेम, असे आई-वडिलांना म्हणणारी लहान मुले आपण पाहताे. तुम्ही त्याला (लहान किंवा माेठा भाऊ-बहीण) रागवत नाहीत. मलाच रागवता. तुम्ही त्याच्यासाठी जास्त गाेष्टी आणता. मला नाही. ही सिब्लिंग रायव्हलरी आहे. साेबतच माेठा भाऊ धाकट्याला धाक दाखवत असताे. त्यांच्यात संघर्ष हाेणे हेही त्यात आले.

{सिब्लिंग रायव्हलरीचा काय परिणाम हाेताे? मुले आपसात सारखा संघर्ष करतात. तेव्हा त्यांच्या दैनंदिन जीवनावरही त्याचा परिणाम हाेताे. त्यांचे वर्तन बदलते. कदाचित एखादे मूल अकारण शांत हाेते किंवा जास्त आक्रमक हाेऊ शकते. यातून मानसिक आराेग्याची समस्या निर्माण हाेऊ शकते.

{अशी स्थिती का निर्माण हाेते? मुलांमध्ये शिक्षण, खेळ, वर्तन, एखादी कामगिरी यावरून हाेणाऱ्या तुलनेतूनदेखील अशी स्थिती निर्माण हाेऊ शकते. मुलांत भांडण झाल्यानंतर एकाची बाजू घेतल्यानेदेखील समस्या हाेऊ शकते. आई-वडिलांचा मुलांशी कमी झालेला संवाद किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष हाेण्यामुळेही ही स्थिती निर्माण हाेते.

{हे कसे टाळता येऊ शकेल? मुलांमध्ये भांडण झाल्यास त्यात पडू नका. त्यांना स्वत:लाच ते साेडवू द्या. भांडण वाढल्यास दाेघांसाेबत बसून त्यांचे म्हणणे एेकून घ्या. त्यानंतर ताेडगा काढावा. तू माेठा आहेस. तुला समजले पाहिजे, असे बाेलणे टाळा. घरी पाहुणा आल्यानंतर मुलांना याेग्य ताे सन्मान द्या. माेठ्या मुलास शिकवताना लहानालादेखील शिक्षणाचे महत्त्व सांगावे. नाते बळकट व्हावे यासाठी त्यांना गाेष्टी एेकण्याची सवय लावा. मुलांना परस्परांना मदत करण्यासाठी प्रेरित करा.

{वयातील बदलाविषयी काय सांगता येईल? मुलगा १०-१२ व्या वर्षात प्रवेश करताे तेव्हा हा मानसिक व शारीरिक संक्रमणाचा काळ असताे. या काळात मुलांमध्ये बंडखाेरवृत्ती पाहायला मिळते.

बातम्या आणखी आहेत...