आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोशल मीडियावर दिसणारे फोटो पाहून तुम्हालाही तुम्ही इतरांपेक्षा कमी सुंदर आहात, त्यांच्याइतक्या फिट नाही, असे वाटू लागले आहे का? असे असेल तर तुम्ही सेल्फी इफेक्टला बळी पडत आहात. सायन्स डायरेक्टमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात आढळले की, सोशल मीडियावर सतत सुशोभित प्रतिमा पाहणे आणि त्यांची तुलना करणे याचा मूड आणि मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. फिल्टर लावून घेतलेले स्वत:चे सेल्फी पुन्हा पुन्हा पाहिल्यानेही स्वत:ची धारणा बदलते. तुम्ही न्यूनगंडाला बळी पडता. परिणामी, वाईट वाटू लागते. सोशल मीडियाचा आपल्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम होत आहे. विशेषतः महिलांना याचा जास्त फटका बसतो. जामा इंटरनॅशनलमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका संशोधनात आढळले की किशोरवयीन मुलींवर मुलांपेक्षा सोशल मीडियाचा जास्त प्रभाव पडतो. नकारात्मक भावना त्यांच्यावर अधिक परिणाम करतात.
५७% किशोरवयीन मुलींना उदास आणि निराश वाटते
अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने २०२१ मध्ये यूथ रिस्क बिहेवियर या नावाखाली एक सर्वेक्षण केले. सर्वेक्षणात आढळले की, ५७ टक्के अमेरिकन किशोरवयीन मुलींना सोशल मीडियामुळे नियमितपणे उदास आणि हताश वाटते, तर २९ टक्के मुलांनी यामुळे दुःखी असल्याचे सांगितले.
सोशल मीडियावरील फोटोंशी तुलना केल्यावर समस्या वाढते
सोशल मीडियावर अनेक लोक ‘फेक’ असतात. हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील मानसशास्त्राच्या सहायक प्राध्यापक केनिशा सिंक्लेअर-मॅकब्राइड यांच्या मते, फोनवर उपलब्ध असलेल्या विविध फिल्टर्स आणि सौंदर्य वाढवणाऱ्या अॅप्सद्वारे चेहऱ्यांची शोभा वाढवली जाते. स्त्रिया त्यांच्याशी तुलना करतात तेव्हा त्यांच्यात न्यूनगंड वाढू लागतो.
झोपेवर परिणाम होतो, स्वतःची नकारात्मक प्रतिमा होऊ लागते
सोशल मीडियाच्या अतिवापराचा झोपेवर वाईट परिणाम होतो. तसेच स्त्रिया त्यांच्या स्वतःच्या शरीराच्या प्रतिमेबद्दल नकारात्मक असतात, त्यामुळे त्यांचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास दोन्हीवर परिणाम होतो. त्यामुळे त्यांच्यात नैराश्याची भावना वाढू लागते. महिलांना ऑनलाइन छळाचा धोकाही अधिक असतो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.