आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफुटबॉल खेळणे जगातील सर्वोत्तम व्यायामांपैकी एक, कारण तो हृदयाला १० वर्षे तरुण ठेवतो
फुटबॉल विश्वचषक २०२२ च्या फायनलमध्ये ३८ वर्षीय मेस्सीच्या चपळाईने २० वर्षीय तरुणांचा पराभव केला आहे. सायन्स नॉर्डिक वेबसाइटनुसार, फुटबॉल हृदयाला १० वर्षांपर्यंत तरुण ठेवू शकतो. फुटबॉलपटूंना इतके वेगवान, मजबूत आणि हृदय तरुण ठेवणारे रहस्य कोणते? आज ही सर्व वैशिष्ट्यं प्रदान करणाऱ्या सहा व्यायामांबद्दल जाणून घ्या. व्यायाम करण्यापूर्वी वॉर्म-अप अवश्य करा.
अॅक्सलरेशन वॉल ड्रील : कसे करावे : आपले दोन्ही हात भिंतीवर ठेवा. पाय मागे ठेवून शरीर सुमारे ४५ अंश कोनात आणा. आता गुडघे एकेक करून छातीकडे आणा. प्रत्येक पायाने सहा वेळा असे करा. फायदे : शरीराला गती देणारे स्नायू सक्रिय होतात. वेग नियंत्रित करण्यास उपयुक्त.
डेड बग व्यायाम : कसा करावा : पाठीवर झोपा, गुडघे ९० अंशांत वाकवा. छताकडे हात वळवा. श्वास घेताना उजवा हात डोक्याच्या दिशेने, डावा पाय जमिनीच्या दिशेने न्या. श्वास सोडताना पूर्वीच्या स्थितीत या. दुसऱ्या मार्गाने पुन्हा करा. प्रत्येक बाजूने १०-१० वेळा करा. फायदे : कोअर आणि हालचालींचे स्नायू मजबूत होतात.
रोमानियन डेडलिफ्ट : कसे करावे : पाय किंचित पसरवा. गुडघे थोडेसे वाकवून नितंबांना मागे ढकलणे. व्यायामासाठी ही योग्य स्थिती आहे. डंबेलसह करा. प्रत्येक वेळी सरळ उभे राहता तेव्हा नितंब पुढे न्या. हे किमान ६ वेळा करा. फायदे : याचा परिणाम जवळपास संपूर्ण शरीरावर होतो. विशेषतः ग्लूट्स, हॅमस्ट्रिंग व कोअर मजबूत होतात.
रेअर फूट एलिव्हेटेड स्प्लिट स्क्वाट : कसे करावे : १२ ते १६ इंच उंच बेंच घ्या. डाव्या पायाची बोटे बेंचवर ठेवून उजवा पाय अंदाजे ९० अंश वाकवा. व्यायाम सोपा वाटत असेल तर दोन्ही हातात डंबेल घ्या. प्रत्येक बाजूला ८ ते १० वेळा करा. फायदे : ग्लूट्स आणि हॅमस्ट्रिंग मजबूत करते. नितंबांची हालचाल चांगली होते. धावण्याची क्षमता वाढते.
स्प्रिंट्स : कसे करावे : प्रथम आपल्या धावण्याच्या तंत्रावर काम करा. त्यानंतर वेग वाढवा. उदाहरणार्थ, संपूर्ण पायाऐवजी बोटांवर धावण्याचा प्रयत्न करा. लांबऐवजी छोट्या स्टेप्स ठेवा. किंचित पुढे झुका आणि धावा. वेगासाठी हात वापरा. फायदे : या व्यायामामुळे शरीराला गती मिळते.
फॉर्वर्ड अल्टरनेटिंग बाउंड्स : कसे करावे : डावा पाय पुढे आणि उजवा पाय मागे घेऊन उभे राहा आणि थोडे पुढे झुका. आता डाव्या पायाने जमिनीवर ढकलून उजव्या पायाने पुढे उडी मारा. आता उजव्या पायावर जोर द्या आणि डाव्या पायावर उडी मारा. त्याच प्रकारे पुढे जा. फायदे : क्षमता वाढते. समन्वय सुधारतो.
अनादी बरुआ हेड कोच, भारतीय वरिष्ठ महिला फुटबॉल टीम
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.