आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lifestyle
  • Health
  • Six Secrets Of A Long, Healthy And Perfect Life, Which In Some Parts Of The World People Live To Be Over 100 Years Old

जागतिक आरोग्य दिन विशेष:दीर्घ, निरोगी व परिपूर्ण आयुष्याची 6 रहस्ये, ज्‍यामुळे जगात काही ठिकाणी लोक 100 वर्षांपेक्षा जास्त जगतात

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केवळ जीवनशैलीच नाही, तर दृष्टिकोनाचाही आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जगात काही ठिकाणी लोक १०० वर्षांपेक्षा जास्त जगतात. त्यांच्या परंपरांतून आपण काय शिकू शकतो ते जाणून घ्या -

जपान - वयाची ५५ वर्षे बालपण आहारात तिप्पट भाज्या, दुप्पट फळे
जपानमधील ओकिनावा येथे लोक सर्वाधिक काळ जगतात. त्याचे एक रहस्य म्हणजे त्यांचा वयाबद्दलचा विश्वास. येथे लोकांना वयाच्या ५५ वर्षांपर्यंत मूल मानले जाते. वयाच्या ९७व्या वर्षी काजिमाया हा विधी होतो. या वयानंतर माणूस पुन्हा तारुण्यात प्रवेश करतो, असे मानले जाते. इतर ठिकाणांच्या तुलनेत येथे लोक तिप्पट भाज्या, दुप्पट फळे खातात.

कॅनडा - इथे कुटुंब आणि समाज तुम्हाला आजारी पडू देत नाही
कॅनडात १०० वर्षांहून अधिक जगणाऱ्या लोकांची सर्वाधिक संख्या वाढत आहे. नोव्हा स्कॉशिया काउंटीच्या रहिवाशांच्या दीर्घायुष्याची दोन मोठी कारणे आहेत – जवळचे संबंध आणि सक्रिय असणे. येथील लोक विनोदी व आशावादी आहेत. संशोधनात म्हटले आहे की, वृद्ध व तरुण एकत्र राहतात तेथे नैराश्य कमी होते. ज्या महिलांना मित्र आहेत त्यांना स्तन, अंडाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता पाचपट कमी असते.

इटली - स्थानिक आहाराचे गुणधर्म हृदयविकाराचा धोका कमी करतात
येथील सार्डिनिया प्रदेशात लोक १०० वर्षांपर्यंत जगतात. त्यांच्या आहारात त्यांच्या बागेतील संपूर्ण धान्य, सोयाबीन, भाज्या आणि मेंढीच्या दुधापासून बनवलेले चीज नक्कीच असते. यामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असते. वाइनचा ते मर्यादित वापर करतात. स्थानिक आहाराच्या मिश्रणाने हृदयविकाराचा धोका ५०%नी घटतो.

कोस्टा रिका- येथे व्यायाम दिनचर्येचा भाग, वयाचा प्रभाव कमी होतो
येथील निकोया द्वीपकल्पातील लोक आहारात बीन्स व कॉर्न यांसारख्या उच्च फायबरयुक्त पदार्थ घेतात. रात्रीचे जेवण दुपारच्या जेवणाच्या अर्धे असते. न्याहारीसाठी भात व बीन्सचा आहार घेतात. ते पहाटे डोंगरावर घोडेस्वारी करतात. सर्व कामांसाठी ते चालणे पसंत करतात. त्यामुळे वयानुसार स्नायू कमी कमकुवत होतात. जे लोक आठवड्यातून १५० मिनिटे मध्यम गतीने व्यायाम करतात ते इतरांपेक्षा १० वर्षांनी लहान दिसतात.

ग्रीस - येथे वामकुक्षी गरजेची, वेळेप्रती लोक लवचिक
येथील लोक नियमितपणे दुपारची झोप घेतात. ग्रीन टी पितात. दुकाने दुपारी किंवा संध्याकाळी उघडतात. वेळ आणि कामाची ही लवचिकता त्यांना बहुतेक उत्तर अमेरिकन लोकांपेक्षा एक दशक जास्त आयुष्य देते. इथे लोक झोप पूर्ण करतात. झोपेच्या कमतरतेमुळे महत्त्वाचे हार्मोनल संतुलन बिघडू शकते. झोपेच्या कमतरतेमुळे वजन वाढते, नैराश्य आणि हृदयविकार होतो.

अमेरिका- येथील धार्मिक श्रद्धेमुळे लोकांचे आयुष्य चार वर्षांनी वाढते

कॅलिफोर्नियातील लिमा लिंडा येथील लोक आठवड्यातून चार ते पाच दिवस मूठभर काजू खातात. ते अल्कोहोल आणि निकोटीनमुक्त जीवनशैलीला दीर्घायुष्याचे श्रेय देतात. चर्चला नियमितपणे जातात. यामुळे तणावापासून आराम मिळतो. ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात दिसून आले की, धार्मिक श्रद्धा व विश्वास ४ वर्षांपर्यंत आयुष्य वाढवू शकतात.

बातम्या आणखी आहेत...