आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोप येत नसेल तर:सकाळच्या दिनचर्येवरून ठरते झोप, झोपेची चिंता नव्हे, जागण्याचा प्रयत्न करा

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांगली झोप येण्याचा सर्वोत्तम नियम म्हणजे आपले मन शांत ठेवणे. मात्र, आपल्याला जेव्हा झोप येत नाही तेव्हा मन शांत ठेवणे थोडे कठीण जाते, विशेषतः असे सतत होत असते तेव्हा. मात्र, विज्ञानावर आधारित काही अशा अपारंपरिक पद्धती आहेत की, त्यांचा अवलंब केल्यास झोप सहज येऊ लागते.

हे पाच उपाय देऊ शकतात झोपेच्या समस्यांपासून दिलासा
प्रयत्नपूर्वक झोपू नये
अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील स्लीप सायकाॅलॉजिस्ट ड्रायर्डे कॉनरॉय यांच्या मते, झोपेची चिंता आणि एंग्झायटीमुळे व्यक्तीला लवकर झोप येत नाही. याउलट अंथरुणावर पडलेल्या व्यक्तीने रात्रभर जागे राहण्याचा प्रयत्न केला, तर एका क्षणी अचानक झोप येईल.

थोडी काळजीही हवी
चांगली झोप घेण्याच्या प्रयत्नात काळजी टाळण्याचा प्रयत्न केला तर ते अधिक त्रास देईल. अशा स्थितीत झोपण्याच्या काही तास आधी समस्यांचा विचार केला तर त्याचा फायदा होईल. कागदाच्या तुकड्यावर दिवसभराच्या चिंता लिहिण्यासाठी १५ मिनिटे काढा.

सकाळ चांगली असावी
सकाळच्या दिनचर्येचा झोपेवर सर्वाधिक परिणाम होतो. सकाळी ठराविक वेळेला उठून प्रथम सूर्यप्रकाशाकडे जा. हे जैविक घड्याळ सेट करेल. यामुळे रात्री झोपण्याची वेळही निश्चित होईल.

निसर्गाबद्दल विचार करा
झोपेसाठी नैसर्गिक आवाज आणि अंधार हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. यूएस ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग टीमचे स्लीप मेडिसिन फिजिशियन जेफ्री डर्मर यांच्या मते, निसर्गामुळे तणाव, रक्तदाब, हृदयगती आणि स्नायूंचा ताण कमी होतो. तुम्ही ताऱ्यांकडे लक्षपूर्वक कधी पाहिले याचा विचार करा. तुटणारा तारा कधी पाहिला होता, याचा विचार करा.

फोकससाठी ४-७-८ नियम
श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने आपण चिंतांपासून दूर जाऊन वर्तमान क्षणात येतो. मन शांत होते. यासाठी ४-७-८ चा नियम पाळा. म्हणजेच ४ सेकंद श्वास घ्या, नंतर ७ सेकंद तो रोखून ठेवा आणि नंतर ८ सेकंद तो बाहेर सोडा.

डॉ. प्रमोद झंवर एमबीबीएस, डीटीसीडी स्लीप एक्सपर्ट

बातम्या आणखी आहेत...