आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lifestyle
  • Health
  • Smoking, Lack Of Fruits And Vegetables In The Diet Along With Alcohol And Obesity Are The Major Causes Of Cancer

आरोग्य:धूम्रपान, मद्यपानाबरोबरच आहारात फळे, भाज्यांचा अभाव आणि लठ्ठपणा ही कर्करोगाचे मोठी कारणे

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दरवर्षी जगभरात 1.8 कोटी कर्करोगाचे नवे रुग्ण वाढतात

डब्ल्यूएचओच्या मते, जगभरात होणाऱ्या मृत्यूंचे दुसरे सर्वात मोठे कारण म्हणजे कर्करोग. २०१८ मध्ये दर ६ मृत्यूंपैकी एक मृत्यू कर्करोगामुळे झाला. ५ प्रमुख कारणे मुख्यत्वे कर्करोगाच्या मृत्यूच्या एकातृतीयांश कारणांसाठी जबाबदार असतात. यामध्ये लठ्ठपणा, अन्नात फळांचा आणि भाज्यांचा कमी वापर, शारीरिकदृष्ट्या निष्क्रियता, तंबाखू आणि मद्यपान यांचा समावेश आहे. कर्करोगाच्या एकूण मृत्यूंपैकी २२% तंबाखूमुळे होतात. पुरुषांमध्ये फुफ्फुसाचा, तर स्तनाचा कर्करोग स्त्रियांमध्ये सर्वाधिक आहे. आपले शरीर विविध अवयव, ऊती आणि पेशींनी बनलेले आहे. पेशींमध्ये त्या व्यक्तीची सर्व आनुवंशिक माहिती असते. त्यात जन्मापासून मृत्यूपर्यंतची माहिती असते. त्यांचे एक जीवनचक्र असते. त्या जन्मतात आणि मरतात, पण त्या मरणे थांबवून वाढू लागतात तेव्हा शरीरात कर्करोग होतो. याची अनेक कारणे आहेत. ४० वर्षांपेक्षा जास्त वयाचे जे लोक धूम्रपान आणि मद्यपान करतात त्यांना याचा सर्वाधिक धोका असतो.

कारणे : लठ्ठपणासह ही पाच कारणे
लठ्ठपणा, आहारात फळे आणि भाज्या कमी खाणे, शारीरिक हालचाल नसणे, तंबाखू सेवन आणि मद्यपान...या पाच प्रमुख कारणांमुळे कर्करोग होण्याची शक्यता असते.

कर्करोगासंबंधी सर्व काही, जे तुम्हाला माहीत असावे
ओळख : अमेरिकन कॅन्सर सोसायटीचा CAUTION फॉर्म्युला स्वीकारा

c म्हणजे Change in bowel or bladder habits
(आतडे, मूत्राशयाच्या सवयींमध्ये बदल होणे )
Aम्हणजे A sore that does not heal ( एखादी जखम लवकरी बरी न होणे )
U म्हणजे Unusual bleeding or discharge
( अतिशय रक्तस्राव होणे)
T म्हणजे Thickening in the breast or elsewhere
( स्तनामध्ये किंवा त्याच्या जवळपास गाठ होणे )
I म्हणजे Indigestion or difficulty in swallowing
( अपचन किंवा पदार्थ गिळण्याला त्रास होणे )
Oम्हणजे Obvious change in a wart or mole
(शरीरावरील मस किंवा तिळामध्ये बदल जाणवणे )
N म्हणजे Nagging cough or hoarseness
( खोकला किंवा दीर्घ काळ घसा बसणे )

उपचार : प्रगत रेडिएशन, इम्युनोथेरपीतील औषधे ही नवी पद्धत
कर्करोगाचा उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी, केमोथेरपी किंवा औषधांचे मिश्रण वापरले जाते. रेडिएशनसाठी लीनियर अॅक्सलरेशन सर्वाधिक आहे. कर्करोगाच्या इम्युनोथेरपी उपचारात सध्या नवीन प्रकारची औषधे वापरली जात आहेत. हे औषध आजाराशी लढा देण्यासाठी रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

डॉ. दिनेश पेंढारकर
संचालक, ऑन्कॉलॉजी सर्वोदय कॅन्सर इन्स्टिट्यूट, फरिदाबाद

बातम्या आणखी आहेत...