आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडिया आणि मानसिक आरोग्य:पापण्यांची हालचाल 70%नी कमी होते, तणाव वाढतो, सोशल मीडियाचा अतिवापर धोकादायक...

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगभरातील 3.6 अब्ज लोक रोज सोशल मीडियावर घालवतात 144 मिनिटे

एका संशोधनानुसार, कोरोना विषाणू महामारीनंतर दररोज टि्वटरचा वापर करणाऱ्यांची संख्या २४% व फेसबुकचा वापर करणाऱ्यांची संख्या २७%टक्क्यांनी वाढली आहे. पूर्वीपेक्षाही जास्त प्रमाणात लोक एकमेकांशी कनेक्ट राहतात व मनाेरंजनासाठी सोशल मीडियाचा वापर करताना दिसून येतात. यामुळे लोकांत याचे व्यसन (अॅडिक्शन ) वाढते आहे.

जर्नल आॅफ क्लिनिकल अँड सोशल सायकाॅलॉजीमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, सोशल मीडिया अॅडिक्शनचा चिंता आणि नैराश्येशी थेट संबंध आहे. याच्या अतिवापरामुळे कार्टिसॉल व अॅड्रेनालइन हार्मोन्सची पातळी वाढते. हे तणाव वाढवणारे हार्मोन्स आहेत. हॉर्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार, एखादी व्यक्ती स्क्रीनवर काम करताना तल्लीन होत असेल तर त्यांच्या पापण्यांची उघडझाप होण्याची गती ७० टक्क्यांनी कमी होते. हेल्थलाइन या आरोग्य मासिकाने साेशल मीडियाच्या व्यसनापासून दूर राहण्याचे काही उपाय सांगितले आहेत. याच्या अतिवापराचा धोका जाणून घ्या.

लाइक पोस्ट पाहण्याचा आनंद नंतर व्यसनच हाेते
खरे तर सोशल मीडिया मानसिक ताण नसलेली मजेदार गोष्ट वाटते, परंतु वास्तविकत: त्याचा आपल्या मेंदूवर महत्त्वपूर्ण परिणाम होतो. तुम्ही आपल्या आवडत्या अ‍ॅपवर लॉग इन करता तेव्हा तुमच्या मेंदूत डोपामाइन सिग्नल वाढतात. हे न्यूरोट्रान्समीटर थेट आनंद आणि आनंदाशी संबंधित आहेत. जसजसा आपण सोशल मीडियाचा वापर वाढवतो तशी आपल्या मेंदूत डोपामाइनची पातळी वाढते. यादरम्यान तुमचा मेंदू ही हालचाल स्वत:साठी बक्षीस म्हणून लक्षात ठेवतो आणि त्याची पुनरावृत्ती करायची इच्छा असते. तुम्ही एखादी पोस्ट करता आणि त्याला सकारात्मक अभिप्राय मिळतो तेव्हा हा आनंद वाढतो, परंतु मुख्य म्हणजे ही सकारात्मक भावना केवळ थोड्या काळासाठीच असते. यानंतर तुमच्या मेंदूत डोपामाइनचा प्रभाव कमी होताच तुम्ही पुन्हा सोशल मीडियाकडे वळता. मग असे पुन्हा पुन्हा होते. मेंदूला ही भावना इतर अॅडिक्शनमध्येही होते.

मनावरील ताण घालवण्याच्या डिजिटल डिटॉक्सच्या चार पद्धती
1. सोशल मीडियाचा मोबाइलवर नव्हे तर संगणकांवर वापर करावा

सोशल मीडियापासून दूर राहायचे असेल तर सर्वप्रथम तुमचा स्क्रीन टाइम जाणून घ्या. साेशल मीडिया अॅप्स मोबाइलवरून काढा. सोशल मीडियाचा वापर नेहमी लॅपटॉप अथवा संगणकावर करावा.

2. बिनकामाच्या अॅप्सचे नोटिफिकेशन बंद करा
जे गरजेचे नाही. त्या अॅप्सच्या सेटिंगवर जाऊन नोटिफिकेशन आॅफ करा. यामुळे फोनवर वारंवार बीप असा आवाज येणार नाही. तुमची सतत फोन पाहण्याची सवय आपोआप सुटेल.

3. सोशल मीडियासाठी रोज ठरावीक वेळ निश्चित करा.
सोशल मीडिया, जर खूपच आवश्यक वाटत असेल तर यासाठी एक वेळ निश्चित करा. यामुळे तुमच्या कामाच्या उत्पादकतेवर पर विपरित परिणाम होणार नाही.

4. घरी नियम करा की, नवे शिकण्याचा प्रयत्न करा. मित्रांशी भेटून गप्पा मारा.
फोन वापराची सवय सोडण्यासाठी घरात काही नियम करा. म्हणजे, न्याहरी, दुपारचे जेवण व रात्रीच्या भोजनाच्या वेळी फाेन बंद ठेवणे. झोपताना बेडरूमच्या बाहेर फोन ठेवणे, हा पर्यायही असू शकतो. अशा प्रकारे काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. आवडते खेळ खेळण्यास सुरुवात करा. मित्रांना फाेनवर न भेटता, स्वत: त्यांना भेटण्यासाठी जाण्याचा प्रयत्न अवश्य करावा.

बातम्या आणखी आहेत...