आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक आरोग्य दिन:विशेष शरीराची काळजी, अशी करा शरीराची सर्व्हिसिंग

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मानवी शरीरातील काही अवयवांत म्हणजे धमन्या, हाडे, यकृत, मेंदूमध्ये वेळोवेळी स्वतःची दुरुस्ती करण्याची नैसर्गिक क्षमता असते. आपण या अवयवांची सर्व्हिसिंग करण्यात मदत करू शकतो. हे कसे शक्य आहे ते जाणून घ्या-

*धमन्या : निरोगी शरीर धमन्यांना मोठेही करू शकते आणि नवीन धमन्या तयारही करू शकते. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. धावणे, पोहणे, उडी मारणे यांसारखे व्यायाम ही प्रक्रिया सुलभ करतात.

*हाडे : हाडे मोडतात तेव्हा त्याच्या उर्वरित भागांमध्ये नवीन पेशी तयार होऊ लागतात. हिरव्या भाज्या खाल्ल्याने हाडे जागोजागी जुळण्यास मदत होते. पालक किंवा ब्रोकोली फायदेशीर ठरू शकते.

*यकृत : रोग सिरोसिसपर्यंत गेला नाही तर यकृत शरीरात पुन्हा विकसित होऊ शकते. याच्या आरोग्यासाठी फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन-बी कॉम्प्लेक्स घेत राहा. दूध, पनीर, अंडी हे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सचे स्रोत आहेत.

*मेंदू : त्वचा सोलली किंवा कापली की ती स्वतःला बरी करते, त्याचप्रमाणे मेंदूमध्ये स्वतःला बरे करण्याची क्षमता असते. व्यायामामुळे मेंदूतील नवीन न्यूरॉन्स तयार होण्यास मदत होते.

*फुप्फुसे : फुप्फुसे स्व-स्वच्छता करू शकतात. रेटिनोइक अॅसिड किंवा व्हिटॅमिन ए यास मदत करू शकतात. गाजर, रताळे किंवा आंबा खाल्ल्याने ही गरज भागू शकते.