आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगा:नवीन वर्षात रोज ही 3 योगासने सुरु करा, तुम्ही राहाल नेहमी तंदुरुस्त आणि निरोगी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन वर्ष 2023 सुरु झाले आहे. नवीन वर्ष म्हणजे नवीन आरोग्य संकल्प. कोरोनाने पुन्हा एकदा धोक्याची घंटा दिली आहे आणि यामुळे पुन्हा एकदा नवीन वर्षात अनेक लोकांनी स्वतःला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्याचा संकल्प केला असेल. निरोगी राहण्यासाठी लोक आहारात बदल करतात, दैनंदिन जीवनात अनेक प्रकारचे व्यायाम समाविष्ट करतात.

नवीन वर्षात तुम्हीही निरोगी आणि तंदुरुस्त राहण्याचा संकल्प घेतला असेल तर तुमच्या दैनंदिन कामात योगाचा समावेश करा. योगासने केल्याने आरोग्य तर चांगले राहतेच पण मनालाही शांती मिळते. आज या बातमीत आम्ही तुम्हाला अशा योगासनांबद्दल सांगत आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही 2023 मध्ये निरोगी आणि तंदुरुस्त राहू शकता.

गोमुखासन

हे आसन करताना आकार गायीच्या मुखासारखा होतो. यामुळे याला गोमुखासन म्हणतात. हे करण्यासाठी तुम्ही दोन्ही पाय समाेर पसरून बसा. आता हाताला बाजूला ठेवा. डाव्या पायाच्या गुडघ्याला दुमडा. आिण उजव्या नितंबाच्या बाजूने जमिनीवर ठेवा. अशाप्रकारेच उजव्या पायाच्या गुडघ्याला दुमडा. आता डाव्या पायाच्या वरून आणा आिण उजव्या टाचेला डाव्या नितंबाजवळ ठेवा. ही क्रिया शांतपणे करा.

- आता डाव्या हाताला उचला आिण कोपराला दुमडून मागे आणि खांद्याच्या खाली आणा.

- आता उजवा हात उचला, कोपराला दुमडा आिण वरच्या बाजूला नेऊन पाठीवर आणा.

- दोन्ही हातांच्या बोटांना पाठीवर एकमेकांत गुंतवून ठेवा.

- आता डोक्याला कोपरावर टेकवून थोडासा मागे धक्का देण्याचा प्रयत्न करा.

- जास्तीत जास्त समोर पाहण्याचा प्रयत्न करा. आणि तुमच्या हिशेबाने आसन धारण करा. हे अर्ध चक्र झाले. पायांची आणि हातांची अवस्था बदलून याला परत करा. आता एक चक्र पूर्ण होईल. याप्रकारे तुम्ही तीन ते पाच चक्र करा.

वज्रासन

‘वज्र’ म्हणजे इंद्राचे अस्त्र. या आसनामध्ये पायांची बैठक वज्राप्रमाणे पक्की असते. म्हणूनच याला वज्रासन म्हणतात. ‘व्रज’ याचाच अर्थ ‘जननेंद्रिय’ असासुद्धा होतो. या आसनाच्या सरावामुळे विशेषत: जननेंद्रियावर व ओटीपोटावर लाभदायक परिणाम होतो.

- डाव्या हातावर व बाजूवर शरीराचा भार घेऊन उजव्या हाताच्या मदतीने उजवा पाय गुडघ्यात दुमडावा. उजव्या पायाचा तळवा आकाशाच्या दिशेने ठेवून पाऊल मागे न्यावे. अशा प्रकारे उजव्या नितंबाखाली उजवे पाऊल व्यवस्थित ठेवावे. - आता शरीराचा भार उजव्या हातावर व बाजूवर घेऊन वरीलप्रमाणे कृती करून डाव्या पायाचे पाऊल डाव्या नितंबाखाली स्थिर करावे. या स्थितीमध्ये दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना लागतील याची काळजी घ्यावी. - पार्श्वभाग उलट्या पावलांवर व्यवस्थित पक्का करावा. ओटीपोटाचा भाग थोडा पुढे करावा. पाठीचा कणा ताठ ठेवावा. - हातांचे तळवे गुडघ्यांवर किंवा गुडघ्यांजवळ मांडीवर ठेवावेत. पोट व हाताचे स्नायू ढिले सोडावेत. - डोळ्यांच्या पापण्या अलगद मिटाव्यात. लक्ष श्वासावर केंद्रित करावे. हीच वज्रासनाची अंतिम स्थिती होय.

सेतुबंधासन

सेतू म्हणजे पूल. या आसनस्थितीत शरीराचा आकार हा पुलासारखा दिसतो. म्हणून त्याला सेतुबंधासन असे म्हणतात.

कसे करावे
पाठीवर सरळ झोपावे. शरीर एका रेषेत असावे. आता हळुवारपणे पायांना गुडघ्यातून वाकवावे. दोन्ही हात शरीरालगत असावेत. आता हळुवारपणे पोटाला वर उचलून वाकवावे. काही सेकंद या आसनस्थितीत राहावे. नंतर हळुवारपणे पोटाला खाली आणावे. श्वास घेत पोटाला पुन्हा वर घ्यावे. आसनस्थितीत नियमित श्वासोच्छ्वास घ्यावा. श्वास सोडत पोटाला खाली आणावे. दहा आकडे मोजेपर्यंत या आसनात थांबावे.

फायदे
- ज्या व्यक्तींना पाठीचा आणि कंबरेचा त्रास आहे त्यांनी हे आसन आवर्जून करावे.
- या आसनाने छाती, मान आणि कण्याला ताण मिळतो.
- डोके शांत होते. ताण कमी होतो.
- अस्थमा असलेल्यांनी हे आसन करावे.
- या आसनाने पचनक्रिया चांगली होते.

बातम्या आणखी आहेत...