आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एचआयआयटी:आठवड्यात 1 दिवसापासून सुरुवात करा, फक्त 30  मिनिटांचे एचआयआयटी देते अचूक तंदुरुस्ती

छत्रपती संभाजीनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एचआयआयटी व्यायाम अजूनही जगातील टॉप २० फिटनेस ट्रेंडमध्ये समाविष्ट आहे. त्याचे वैशिष्ट्य असे की, ३० मिनिटांचा एचआयआयटी व्यायाम तुम्हाला परिपूर्ण फिटनेस देऊ शकतो, परंतु तरीही तो योग्य पद्धतीने करण्याचा मोठा प्रश्न आहे. योग्य एचआयआयटीमध्ये उच्च-तीव्रतेच्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी व्यायामाच्या अनेक छोट्या फेऱ्यांचा समावेश असतो, प्रत्येक फेरी जास्तीत जास्त २० सेकंदांचे असते, त्यानंतर पुरेशी विश्रांती असते. हळूहळू ही विश्रांतीची वेळ कमी करता येते.

एचआयआयटीसंबंधी सर्वकाही का करावा हा व्यायाम? धावणे, सायकलिंग, ब्रिस्क वाॅक यांसारख्या ४५ ते ६० मिनिटांच्या कमी तीव्रतेच्या कार्डिओ व्यायामासह इतर व्यायामांच्या तुलनेत एचआयआयटी एरोबिक प्रशिक्षणासाठी अधिक लाभदायक आहे. २०१९ मधील नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या संशोधनानुसार, ते हृदयगती दीर्घकाळ स्थिर ठेवते. तसेच इतर कार्डिओ व्हॅस्क्युलर व्यायामाच्या तुलनेत एचआयआयटी सामान्य वेळेत जास्त कॅलरी बर्न करते, याचा अर्थ ते वजन वेगाने कमी करण्यासही मदत करते.

योग्य एचआयआयटी व्यायाम कोणता? एचआयआयटी व्यायाम हा एक आहे, त्यामध्ये हृदयगती हृदयाच्या क्षमतेच्या ८० टक्क्यांपर्यंत पोहोचते. तसेच ती सामान्य होण्यापूर्वी पुन्हा पुन्हा या क्षमतेवर घेतली पाहिजे.

हा व्यायाम करण्याची योग्य पद्धत कोणती? तुम्हाला एचआयआयटी सुरू करायचे असेल तर आठवड्यातून एक दिवस सुरू करा. सर्वात सोपा मार्ग म्हणजे कार्डिओ व्यायामांपैकी एकाने सराव सुरू करणे. वॉर्म अप केल्यानंतर १० सेकंदांसाठी शक्य तितक्या वेगाने धावा. यानंतर हलके चालणे किंवा ५० सेकंद विश्रांती घ्या. हे सहा वेळा पुन्हा करा. यानंतर जसजसा तुम्हाला आराम मिळेल, विश्रांतीचा कालावधी २० सेकंद आणि नंतर १० सेकंदांपर्यंत घ्या. तुम्ही ते चांगले करण्यास सुरुवात करता तेव्हा ते एका आठवड्यात एचआयआयटीच्या दोन ते तीन सत्रांपर्यंत वाढवू शकता, परंतु त्यापेक्षा जास्त नको.

टीप : हृदयाशी संबंधित समस्या किंवा इतर आजार असल्यास, गर्भवती असाल किंवा दुखापतीतून बरे होत असाल तर एचआयआयटी करू नका. हे व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.