आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्यान:3-5 मिनिटांपासून प्रारंभ करा, चालता-चालता गोष्टींकडे लक्ष द्या

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फोनचे व्यसन लागलेल्या जीवनशैलीत ध्यान करणे कठीण झाले आहे. तुम्हीही या परिस्थितीशी झगडत असाल तर या पद्धती ध्यानासाठी मदत करू शकतात.

आधी हे जाणून घ्या... ध्यान न लागणे हीच ध्यानाची पहिली पायरी : अमेरिकेतील न्यूयॉर्क विद्यापीठातील क्लिनिकल असिस्टंट प्रोफेसर डेव्हिड एस्टर्न यांच्या मते, सुरुवातीला ध्यान करायला बसाल तेव्हा विचलित व्हाल. फक्त १० सेकंद ध्यान करू शकलात तरी तेदेखील तुमचे यश आहे. थोड्याशा ध्यानानेही एकाग्रता वाढते : टेन पर्सेंट हॅपियर या माइंडफुलनेस अॅपचे संस्थापक डॅन हॅरिस यांच्या मते, ध्यान करताना विचलित होणे म्हणजे अपयशी होणे नाही. काही मिनिटे ध्यान केल्याने तुमची एकाग्रता अधिक वाढते. ते चिंता आणि नैराश्य कमी करते.

काय करावे... मायक्रो मेडिटेशन करा : ड्यूक युनिव्हर्सिटीचे असोसिएट प्रोफेसर जॉन मिशेल यांच्या मते, सुरुवातीला १५ किंवा ३० मिनिटे ध्यान करण्याचा प्रयत्न केला तर ते कठीण होईल. ३ ते ५ मिनिटांच्या ध्यानाने सुरुवात करा. मग ते वाढवा. चालता-चालता गोष्टींकडे लक्ष द्या : ध्यान तुम्हाला सध्याच्या क्षणात आणते. चालताना गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही हा क्षण अनुभवू शकता. हे एकाग्रता वाढवण्यासही मदत करते. कंटाळा आला तर जिज्ञासेने तो दूर करा : कंटाळा येत असेल तर ध्यान करताना पक्ष्यांचे आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. श्वास नाकातून बाहेर पडणे अनुभवा.

बातम्या आणखी आहेत...