आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चांगल्या आरोग्यासाठी डॉक्टरांकडून नेहमी चालण्याचा सल्ला दिला जातो. ज्यांना जिममध्ये जाणे शक्य नसते अशा व्यक्तींनी दररोज चालण्याचा व्यायाम केल्यास शरीरास फायदा होतो. चालण्याने स्नायू मजबूत होतात. तसेच शरीरास अनेक फायदे होतात. व्यायामाचा हा प्रकार दररोज केल्याने शरीर तंदुरुस्त राहते. हल्लीच्या व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांना व्यायाम करण्यास वेळ मिळत नाही अशावेळेस चालण्याचा व्यायाम जरूर करावा.
> मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते. पचनक्रिया सुधारते, पचनाचे विकार कमी होतात. चयापचय संस्था सुधारते. अंतस्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते. हाडे, कंबर, मांड्या, पायाचे स्नायू मजबूत होतात. शिवाय रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
> चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो. सतत काम करून तना-मनाला आलेला थकवाही दूर होतो. तणाव आणि चिडचिडेपणा दूर होण्यास मदत होते आिण झोपही चांगली लागते.
> वॉकिंगमुळे हृदयाची गती वाढते. फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते. चयापचय संस्था सुधारते. शरीरातील कॅलरी खर्च होतात. कोणत्याही वयात आपण हा व्यायाम करू शकता. वजन कमी करण्याचा किंवा राखण्याचा हा उत्तम मार्ग आहे.
> आठवड्यातून तीन ते चार वेळा विशेषतः सकाळी वीस ते तीस मिनिटे न थांबता चालल्यास आरोग्यासाठी उत्तम आहे.
> वजन कमी करण्यासाठी वॉकिंग अतिशय फायदेशीर आहे. चालल्यामुळे पाय, नितंब, पोटाच्या पेशींना ताकद मिळते. त्यामुळे चरबी कमी होते. झपझप चालण्यामुळे हृदयाची गती व स्टॅमिना वाढतो. नियमित चालल्यामुळे फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.