आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासकारात्मकतेमुळे आरोग्य सुधारू शकते. त्याचबरोबर दीर्घायुषी जगणेही शक्य होते. कारण आशावादी राहणे दैनंदिन व्यायामासारखे असते. एका अध्ययनानुसार आशावादी लोक ९० वर्षांहून जास्त जगू शकतात. जर्नल ऑफ अमेरिकन गेरियाट्रिक्समध्ये प्रकाशित अहवालात आशावादी व्यक्तींबद्दलचा हा दावा करण्यात आला आहे. अशा व्यक्ती भविष्याबद्दल सकारात्मक विचार करणाऱ्या असतात. गेल्या २६ वर्षांतील आकडेवारीच्या अभ्यासानंतर हा दावा करण्यात आला आहे. त्यात विविध पदांवर, स्तरावर कार्यरत असलेल्या १,५९,२५५ महिलांना सहभागी होत्या. आशावादी असण्याबद्दलच्या प्रश्नाच्या उत्तरात अव्वल २५ टक्क्यांमध्ये महिलांचा जीवनकाळ सकारात्मक नसलेल्या महिलांच्या तुलनेत ५.४ टक्क्यांनी जास्त होता. आशावादी महिलांची जगण्याची शक्यता १० टक्के जास्त होती.
आशावादी व्यक्तीचे जीवन ४.४ वर्षांनी जास्त
दैनंदिन व्यायामातून आयुष्यात ०.४ ते ४.२ वर्षांची भर पडू शकते, असे अनेक अध्ययनातून समोर आले आहे. जर्नल ऑफ अमेरिकन गेरियाट्रिक्सच्या ताज्या अहवालातदेखील आशावादी महिलांचे आयुष्य आशावादी नसलेल्या महिलांच्या तुलनेत ४.४ वर्षांनी जास्त असल्याचे म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.