आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संशोधन:अचानक नाकातून रक्तस्राव होणे म्हणजे उच्च रक्तदाब, 14 वर्षांच्या संशोधनानंतर निष्कर्ष

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते, त्यामुळे नाकातून रक्तस्राव होतो

दक्षिण कोरियाच्या संशोधकांनी ३५,७४९ लोकांवर केलेल्या संशोधनावरून आढळले आहे की, उच्च रक्तदाब थेट नाकातील रक्तस्रावाशी संबंधित आहे. उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना याचा धोका सुमारे ४७ टक्क्यांनी वाढला आहे.

उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते, त्यामुळे नाकातून रक्तस्राव होतो
उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांमध्ये रक्तस्राव अधिक होत असल्याचे अभ्यासकांना अाढळले आहे. अशा रुग्णांना २.७ टक्के अधिक अतिदक्षतेत उपचार करावा लागला. अभ्यासकांच्या मते,उच्च रक्तदाबामुळे रक्त वाहिन्यांचे गंभीर नुकसान होते, त्यामुळे रक्तस्राव होतो. या संशोधनाचे सहायक सियोग येथील हान्यंग विद्यापीठाचे ऑटोलर्यनोलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. जै हो चुंग यांच्या मते, ज्या लोकांना नाकातील रक्तस्राव होण्याचा कोणताही धोका नव्हता अशा लोकांचा अभ्यासात समावेश करण्यात आला आहे.

14 वर्षांच्या संशोधनानंतर निष्कर्ष
उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांच्या नाकातून रक्तस्राव होण्याच्या ३५,७४९ प्रकरणांचा अभ्यासकांनी अभ्यास केला. यासाठी, नियंत्रित रक्तदाब असलेल्या ३५,७४९ लोकांची नाकातून रक्तस्राव होण्याच्या प्रकरणांशी तुलना केली गेली. संशोधकांनी १४ वर्षांपासून दोन्ही गटांतील व्यक्तींमध्ये होणाऱ्या रक्तस्रावाला ट्रॅक केले आहे.

बातम्या आणखी आहेत...