आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोबाईल हा जीवनाचा एक भाग झाला आहे. रात्री उशिरापर्यंत आणि पहाटेपर्यंत मोबाईलचा वापर सर्रास होतो. ही सवय एखाद्या व्यसनापेक्षा कमी नाही, ही सवय मोडणे फार अवघड आहे. सकाळी उठल्यापासून मोबाईल वापरण्याचे काय नुकसान आहे, हे मानसशास्त्रज्ञ योगिता कडियान यांनी सांगतिले आहे.
मोबाईलशिवाय झोप येत नाही
मोबाईलशिवाय माणसांना झोप येत नाही. पण हा विषय इथे संपत नाही, अंथरुणातून अठल्याबरोबर माणसांना मोबाईल हातात हवा असतो. पण तुम्हाला याची कल्पना आहे का, मोबाईलचे लागलेले व्यसन तुमचे नुकसान करते.
उच्च रक्तदाब
सकाळी झोपेतुन जेव्हा आपण सतत एखाद्या गोष्टीचा विचार करतो तेव्हा बीपी होण्याची शक्यता असते. सोशल मीडियावर असलेल्या अफवा वाचून तणाव घेतल्याने हा आजार होऊ शकतो. ्यामुळे अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागते.
थकवा आणि आळस
सारखी सारखी मोबाईलची स्क्रिन पाहून, काल काय केलं होतं, आणि आज काय करायचे आहे यातच आपण गुंतलेलो असतो. अशा लोकांच्या मनात काम पुर्ण करण्यासाठी भीती आणि चिंता वाटू लागते. सकाळपासूनच अशा लोकांच्या शरीरातील ऊर्जा कमी होऊ लागते. याच कारणामुळे थकवा आणि आळस माणसाला येतो.
सकाळी उठल्यावर, ई-मेल्स किंवा नोटिफिकेशन्स तपासताना भूतकाळातील काही गोष्टी वाचून आपण अस्वस्थ होतो, त्यामुळे मन वाईट गोष्टींमध्ये अडकून पडते.
चिंता आणि तणाव
दिवसाची सुरुवात कोणत्याही तणाव आणि चिंता न करता शांत चित्ताने करावी. सकाळी उठल्याबरोबर तुमचा मोबाईल अनेक मेसेजेस, ई-मेल्स, फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम अशा नॉन-निगोशिएबल मेसेजने भरलेला असतो. सकाळी मोबाईल हातात घेतल्यावर सोशल मीडियावर पडलेल्या पोस्ट पाहल्या जातात.
चिडचिडेपणा वाढतो
सोशल मीडियाचे व्यसन इतके लागून जाते की, सहजपणे मोबाईल तपासतांना माणसाची चिडचिड होते. याचे कारण म्हणजे मोबाईमध्ये एखादी नकारात्मक गोष्ट दिसली की, याटा परिणाम तुमच्या वागणूकीवर होतो. सारखा सारखा राग येणे हे देखील याचे कारण असू शकते.
कामावर वाईट परिणाम होतो
सकाळी उठल्यावर आधी मोबाईलचे नोटिफिकेशन पाहिल्यावर माणसाचे मन त्याला जुन्या गोष्टींचा विचार करण्यास भाग पाडते. असे झाल्यावर कोणत्याच कामात लक्ष लागत नाही. व याच कारणामुळे तुमच्या कामांवर वाईट परिणाम होतो.
उदासीनता वाटणे
जे रात्री मोबाईल बघून झोपतात आणि सकाळी उठल्याबरोबर मोबाईल बघतात त्यांची प्रकृती खराब होऊ शकते. असे लोक सोशल मीडियाचा जास्त वापर करतात.फेसबुक, व्हॉट्सअॅपवरील लोकांच्या अॅक्टिव्हिटीशी स्वतःची तुलना करू लागतात, त्यामुळेच ते खऱ्या आयुष्यात नैराश्याला बळी पडतात. कोणाच्याही बोलण्याचा राग येतो जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.