आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा२०३५ पर्यंत सुमारे ४ अब्ज लोक लठ्ठ किंवा जास्त वजनाच्या श्रेणीत येतील. त्याचा धोका आशिया आणि आफ्रिकन देशांमध्ये सर्वाधिक आहे. द वर्ल्ड ओबेसिटी अॅटलस २०२३ च्या अहवालानुसार, भारतीय बालके आणि किशोरवयीन मुलांमधील लठ्ठपणा २०२० च्या अंदाजापेक्षा दुप्पट वेगाने वाढत आहे. २०२० ते २०३५ दरम्यान जिथे भारतीय प्रौढांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण ५.२ टक्के असल्याचा अंदाज आहे, तिथे मुलांमध्ये हे प्रमाण ९.१ टक्के असेल, हे अधिक चिंताजनक आहे. इटिंग डिसऑर्डर तज्ज्ञ आणि डायटिशियन अॅना लुट्झ यांच्या मते, मुलांच्या वाढत्या वजनाची चिंता करण्याऐवजी पालकांनी मुलांची भावनिक व शारीरिक काळजी घेण्यावर भर दिला पाहिजे. त्यांना दररोज किमान एक तास निसर्गात खेळू द्या. त्यांच्याबरोबर खेळात सहभागी व्हा. याशिवाय स्क्रीन टाइम नियंत्रित करून वजन वाढणे टाळता येते.
फास्ट फूड आणि शुगर ड्रिंक हे लहान मुलांमधील लठ्ठपणाचे सर्वात मोठे कारण आहार : २:१:१ चा फाॅर्म्युला स्वीकारा मुलांच्या एकूण आहाराच्या ५० टक्के म्हणजे २ भाग फळे आणि भाज्यांचे ठेवा. फळे आणि भाज्या शरीराला सर्व आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे, आहारातील फायबर आणि पोषक तत्त्वे प्रदान करतात. त्यांच्यामध्ये कॅलरी खूप कमी असतात, त्यामुळे दीर्घकाळ भूक लागत नाही. कडधान्य २५ टक्के म्हणजे एक भाग कर्बोदके म्हणून समाविष्ट करा. त्यात फायबर, व्हिटॅमिन बी, लोह यासह अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स असतात. शरीराच्या संचालनासाठी ६० टक्के ऊर्जा यातून मिळते. दूध, कडधान्ये, दही, चीज, टोफू, नट्स इ.चा २५ टक्के म्हणजे एक भाग प्रथिने म्हणून समावेश करा. त्यामुळे शरीराला आयोडीन, लोह, झिंक, जीवनसत्त्वे आणि फॅटी अॅसिड्ससारखे आवश्यक घटक मिळतात. आजारांचा धोका कमी होतो.
पेय : ताक, लिंबू-पाणी हे चांगले पर्याय सॉफ्ट ड्रिंक्स, पॅक केलेले ज्यूस इ. साखरेमुळे गोड असलेल्या पेयांना लिक्विड शुगर म्हणतात. अन्नाच्या स्वरूपात घेतलेल्या आहाराव्यतिरिक्त त्यांचे सेवन केल्याने कॅलरीजचे प्रमाण वाढते. ते इन्सुलिन प्रतिरोधक क्षमताही वाढवतात. त्यामुळे लठ्ठपणा, टाइप-२ मधुमेह, हृदयविकार यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. त्याऐवजी मुलांना ताक, लिंबू-पाणी आणि साधे पाणी देण्याची सवय लावा. ते केवळ तहान योग्य प्रकारे शमवत नाहीत, तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासही मदत करतात.
खेळ : लपाछपी, खो-खोही प्रभावी अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या मते, दोरीवरच्या उड्या, लपाछपी, खो-खो, रस्सीखेच, हुला हुप्स इ. पारंपरिक खेळ मुलांना शारीरिकदृष्ट्या सक्रिय ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहेत. वेबएमडीच्या मते, मुले १० मिनिटे दोरीवर उडी मारून १२५ कॅलरीज बर्न करू शकतात. एवढेच नाही, तर १० मिनिटे वेगवान दोरीवर उडी मारल्याने ३० मिनिटांच्या जॉगिंगइतकीच ऊर्जा खर्च होते. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) नुसार, ३ ते ५ वयोगटातील मुलांनी दिवसभर सक्रिय असले पाहिजे, तर १७ वर्षांपर्यंतच्या मुलांनी जवळजवळ दररोज ६० मिनिटे किंवा त्याहून अधिक शारीरिक हालचाली केल्या पाहिजेत, ते वजन नियंत्रित करण्यास मदत करते.
स्क्रीन टाइम : जास्तीत जास्त २ तास स्क्रीन (टीव्ही + मोबाइल) मुळे होणाऱ्या नुकसानीला मोठ्या टर्ममध्ये कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम (सीव्हीएस) म्हणतात. यामुळे डोळे दुखणे, कोरडे डोळे आणि ताण, अस्पष्ट दृष्टी, लक्ष केंद्रित करण्यात अडचण, डोकेदुखी यांसारख्या तक्रारी होतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या मते, जी मुले इलेक्ट्रॉनिक उपकरणावर दिवसातून २ तासांपेक्षा जास्त वेळ घालवतात त्यांच्या विचार करण्याच्या आणि भाषा शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.