आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सपर्ट Q & A:विचार दाबल्याने वाढतो पॅनिक अ‍ॅटॅकचा धोका

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१७ नोव्हेंबरच्या अंकात पॅनिक अ‍ॅटॅकशी संबंधित लेख प्रसिद्ध झाला होता. यासंदर्भात वाचकांनी मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले आहेत. त्यातील मुख्य प्रश्नांची उत्तरे...

Q. तरुणांना पॅनिक अ‍ॅटॅकचा अधिक धोका का असतो? {पॅनिक अ‍ॅटॅक सुरू होण्याचे सरासरी वय २४ वर्षे आहे. तरुणांमध्ये हे अधिक दिसून येते, विचित्र परिस्थिती आणि तणावाचा योग्य प्रकारे सामना न करणे हेदेखील याचे कारण असू शकते. व्यसन आणि वाईट जीवनशैलीमुळेही याचा धोका वाढतो.

Q. मानसिक अस्थिरता खूप जास्त आहे. अनावश्यक विचारांची साखळी सुरू असते. वर्तमानात जगता येत नाही. हे काय आहे? {ही लक्षणे न्यूरोसिस गटाच्या आजारांची निदर्शक आहेत. नैराश्य, तणाव, चिंता, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरमध्ये ही अशी लक्षणे दिसतात. ती उच्च तणावाच्या परिस्थितीतही दिसू शकतात.

Q. एखादा विचार जास्त काळ धरून ठेवल्याने पॅनिक अ‍ॅटॅकचा धोका वाढतो का? {हो, दीर्घकाळ विचार मनात ठेवल्याने पॅनिक अ‍ॅटॅकचा धोकाही वाढतो. हे टाळण्यासाठी, सामाजिक वर्तुळ वाढवा, कुटुंब आणि मित्रांच्या संपर्कात राहा. विचार मनातच ठेवू नका. ते नातेवाइकांना शेअर करा. एकटेपणा टाळण्यासाठी डायरीदेखील लिहिता येते, कोणत्याही छंदासाठी वेळ देण्याचा प्रयत्न करा. शारीरिक तंदुरुस्तीचीही काळजी घ्या.

Q. धाप लागणे, छाती आखडणे, गुदमरल्यासारखे वाटणे, अचानक घाम येणे. हा पॅनिक अ‍ॅटॅक असू शकतो का? {होय, ही सर्व लक्षणे पॅनिक अ‍ॅटॅकमध्ये दिसतात. याशिवाय अचानक घाबरून जाणे आणि हिंमत हावणे हेदेखील यात दिसून येते. असे झाल्यास निश्चितपणे डॉक्टरांशी संपर्क साधा.

Q. पॅनिक अ‍ॅटॅक प्राणघातक ठरू शकतो का? {नाही, पॅनिक अ‍ॅटॅक प्राणघातक ठरू शकत नाही. असे झाल्यास संयम ठेवा आणि त्वरित उपचार करा. डॉ. परमजित सिंह कन्सल्टंट सायकियाट्रिस्ट अँड को-डायरेक्टर, दिल्ली माइंड क्लिनिक

बातम्या आणखी आहेत...