आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

झोप का महत्त्वाची:विषाणूला मारणाऱ्या टी पेशी चांगल्या झोपेमुळे सक्रिय होतात

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रिटनच्या ‘द स्लीप स्कूल’कडून जाणून घ्या

अपुऱ्या झोपेचा आपल्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडत असतो. कोरोनाच्या या काळात ट्विटरवर #cantsleep बरेच काळ ट्रेंडमध्ये होते. ब्रिटनच्या द स्लीप स्कूलचे संस्थापक डॉ. गाय मिडोज यांच्या मते, ७ ते ८ तासांची झोप घेतल्याने टी सेल्स मजबूत होतात. टी सेल्स पांढऱ्या रक्तपेशींचा एक प्रकार आहे. त्या व्हायरसवर हल्ला करत त्यांना नष्ट करतात.

रोगावर झोपेचा परिणाम 
शरीराच्या आंतरिक भागातही झाेपेचा परिणाम जाणवतो. याला विज्ञानाच्या भाषेत सर्केडियन रिदम असे म्हणतात. तुम्ही जर तुमच्या झोपण्याच्या, उठण्याच्या आणि खाण्याच्या वेळा ठरवल्या तर आतील बॉडी योग्य प्रकारे काम करते. एवढेच नव्हे तर झोपदेखील चांगली येते.

पुन्हा झोप घेण्यासाठी एक पद्धत 
बरेच लोक व्यायाम, सायकल चालवणे आणि फिरणे या आपल्या आवडत्या कामापासून दूर आहेत. त्यामुळे डॉ. गाय मिडोज म्हणतात, तुम्ही तुमचे नियमित काम पुन्हा सुरू केले तर शरीराचे घड्याळ पुन्हा सक्रिय होऊ शकते. तुम्ही घरातच १० मिनिटे चकरा मारू शकता.

डीएमएनला ठेवा संतुलित 
द स्लीप स्कूलनुसार, आपण झोपायला जातो, तेव्हा मन काळजी करू लागते. यासाठी जबाबदार मेंदूच्या भागास डीफॉल्ट मोड नेटवर्क (डीएमएन) म्हणतात. नकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करण्यासाठीच ते बनलेले आहे. त्यापासून सुटका मिळवायची असेल तर चिंता करायला लावणाऱ्या विचारांकडे लक्ष द्या.