आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोग्य:सतत मास्क लावल्याने त्रास होत असेल तर ही काळजी घ्या

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वारंवार हात धुण्यामुळे हातांना कोरडेपणा येतो आणि त्वचा निर्जीव होते

कोरोना संपूर्ण जगभरात पसरला आहे. या व्हायरसचा फैलाव होऊ नये म्हणून सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती आहे. लोक घरात बंद आहेत. जागतिक आरोग्य संघटना आणि रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्रे यांनी अनेक मार्गदर्शक बाबी करत सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. त्यात मास्क घालणे, हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंग हे प्रमुख आहे. मात्र वारंवार हात धुण्यामुळे हातांना कोरडेपणा येतो आणि त्वचा निर्जीव होते. तसेच सतत मास्क लावल्याने त्वचेशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो. यामुळे चेहऱ्यावर रॅशेस आणि जळजळ होण्याची शक्यता असते. तुमच्या बाबतीत असे घडत असेल तर या टिप्स वापरून पहा...

१.

त्वचेच्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी आपला चेहरा नेहमीच हायड्रेटेड ठेवा. यासह त्वचा ओली ठेवा. यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या. यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारेल आणि सतत मास्क लावल्यामुळे त्वचेच्या समस्याही दूर होतील.

२.

दर दोन तासांनी मास्क चेहऱ्यावरून काढले पाहिजे. मास्क अशा जागी ठेवा जिथे संक्रमणाचा धोका खूप कमी असेल. मास्क केवळ आणि केवळ घरातच काढा. यावेळी तुमचा चेहरा चांगल्या प्रकारे धुवून घ्या.

३.

चेहऱ्याला घाम आला असेल तर मास्क लावू नये. आपण घामेजलेल्या त्वचेवर मास्क लावले तर यामुळे त्वचेची समस्या उद्भवू शकते. अशात मास्क लावण्यापूर्वी आपला चेहरा मऊ टॉवेलने पुसल्यानंतरच मास्क लावा.

४.

मास्क लावाल तेव्हा त्याच्या ३० मिनिटानंतर अगोदर फेस क्रीमचा वापर नक्की करा. यानंतरच मास्क घाला. त्वचेची काळजी घ्या. मास्क काढल्यावर सर्वप्रथम आपले हात हँडवॉशने धुवा. यानंतर चेहरा फेस वॉशने धुवा.

बातम्या आणखी आहेत...