आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोग्य:सर्दी आणि खोकला होऊ नये म्हणून ही घ्या खबरदारी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या कोराेना व्हायरसचाही प्रादुर्भाव खूप जास्त आहे आणि या आजाराची लक्षणेदेखील सर्दी, खोकला, पडसे, घसादुखी ही आहेत.

निरोगी राहण्यासाठी आपल्याला स्वतःकडे लक्ष देण्याची गरज असते. त्यासाठी स्वतःची काळजी स्वतःच घ्यावयाची असते. सध्या कोराेना व्हायरसचाही प्रादुर्भाव खूप जास्त आहे आणि या आजाराची लक्षणेदेखील सर्दी, खोकला, पडसे, घसादुखी ही आहेत. त्यामुळे यासारख्या त्रासाला सामोरे जावे लागू नये म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. चला तर मग कोणत्या गोष्टी कराव्यात हे जाणून घेऊया....

रोगप्रतिकारशक्ती : आपल्याला निरोगी राहण्यासाठी आपली रोगप्रतिकारशक्ती बळकट करावी लागेल. यासाठी आहारामध्ये फळ आणि भाज्यांचा समावेश करावा लागणार. त्याचबरोबर आपल्या दिनचर्येत योगा आणि व्यायामाचाही समावेश करावा लागेल.

ज्येष्ठमध आणि पाणी

: अर्धा कप पाण्यात ज्येष्ठमधाची पावडर आणि ८ -१० तुळशीची पाने टाकून उकळून घ्या आणि चहासारखे प्या.

कोमट पाणी

: फ्रिजचे पाणी पिण्याऐवजी कोमट पाणी पिण्याची सवय लावा. ही सवय आपला घसा स्वच्छ ठेवण्यास मदत करेल.

हळदीचे दूध

: दररोज रात्री झोपण्याआधी हळदीचे दूध पिण्याची सवय लावायला लावा. हे आपल्याला सर्दीच्या त्रासांपासून लांब तर ठेवणारच, त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासदेखील मदत करेल.

तुळस आणि अद्रक

: सकाळच्या चहाची सुरुवात तुळस आणि आलं घालून करावी. हे आपल्या घशाच्या सर्व त्रासांना तसेच सर्दी दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते. नियमाने याचे सेवन करावे.

बातम्या आणखी आहेत...