आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नुकताच पावसाळा सुरू झाला आहे. या दिवसात वातावरणात सतत बदल होत असतात. पण, या वातावरणातील बदलांचा आपल्या त्वचेवरही परिणाम होतो. यामुळे काळजी घेणे गरजेचे असते. त्यातच पावसाळ्यात सतत भिजल्याने त्वचेवरही परिणाम होतो. साचलेल्या पाण्यातून जातानाही त्वचासंसर्ग होऊ शकतो. हे टाळायचे असेल तर काळजी घेणे आवश्यक आहे.
पावसाळ्यात अशी घ्या काळजी
> पावसाळ्यात आपल्या त्वचेची काळजी घ्यावी लागते. आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी या काही टिप्स -
> वातावरणातील आर्द्रतेमुळे त्वचा ओलसर असते. यामुळे या दिवसात सनस्क्रीन लावणे टाळावे.
> पावसाळ्यात जास्त मेकअप करणे टाळावे. वॉटरप्रूफ मेकअपचा वापर करणे उत्तम.
> ब्लीच आणि फेशियल करणे टाळा कारण चेहऱ्यावरील त्वचा खरखरीत होण्याची शक्यता असते.
> रात्री झोपण्यापूर्वी ओठांना दुधाची मलई लावा. गडद रंगाची लिपस्टिक वापरणे टाळा. ओठ फुटल्याचे जाणवल्यास त्यावर नारळाच्या तेलाचा वापर केल्यास उत्तम.
> कडूनिंबाची पाने अंघोळ करताना गरम पाण्यात टाकून अंघोळ करा. त्याने आपल्याला ताजेतवाने आणि निरोगी राहण्यास मदत होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.