आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोग्य:गाढ झोप येण्यासाठी या पदार्थांचे करा सेवन, वारंवार ती मोडणारही नाही

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रोज घ्यायला हवा असा आहार, यामुळे येईल चांगली झोप

निरोगी आरोग्यासाठी झोप चांगली होणे गरजेचे आहे. यामुळे तुम्हाला गंभीर आजार होत नाहीत. मेंदू शांत राहतो. विविध संशोधनांनुसार, गाढ झोपेसाठी एक आठवडा आहारात पुढील गोष्टींचा अवलंब केल्यास तुम्हाला लवकरच याचा परिणाम जाणवेल. झोपण्याआधी यापैकी एक किंवा दोन पदार्थांचे सेवन सुरू करा. फरक जाणवताच त्याचा रोजच्या जीवनशैलीत अवलंब करा.

कोमट दूध
दूध झोपेसाठी रामबाण आैषध आहे. यात ट्रिप्टॅफेन नावाचे अॅमिनो अॅसिड असते. ते सेरोटॉनिनमध्ये बदलते. सेरोटॉनिन मेलाटॉनिन हाॅर्मोन्स वाढवते. चांगल्या झोपेने कॅलरी जास्त खर्च होते. रात्री जाग आली तरी पोट भरलेले जाणवते. त्यामुळे पुन्हा लवकर झोप येते.

कधी व किती : कोमट दूध झोपण्याच्या अर्धा तास आधी प्यावे. यात हळद टाकू शकता.

केळी व मध
आयुर्वेदानुसार रात्री केळी खाऊ नयेत. संशोधकांच्या मते, झोपण्यापूर्वी एक तास आधी केळी खाल्ल्याने झोप चांगली येते. कारण केळांत ट्रॅप्टोफेन असते. चहाच्या लहान चमच्याइतक्या मधाचे सेवन केल्याने ऑरेक्सिन रिसेप्टर शांत करते. हा रिसेप्टेर मेंदूला तरतरीत ठेवतो.

कधी व किती : मध झोपताना व एक केळ तासभर आधी खावे.

चेरीचा ज्यूस
चेरीमध्ये उत्तम झोप येण्यासाठी चार आवश्यक बाबी -ट्रिप्टॅफेन, सेरॅटॉनिन, मेलाटॉनिन व पोटॅशियम असतात. संशोधनानुसार, चेरी खूप व्यायाम व थकवा घालवते. गोड चेरीपेक्षा वेगळ्या टॉर्ट चेरीज स्नॅक अथवा ज्यूसच्या रूपात घेऊ शकता. यात जीवनसत्त्व क असते.

कधी व किती : टार्ट चेरीचा ज्यूस अथवा स्नॅक झोपण्यापूर्वी एक तास आधी घ्यावे. गोड चेरीही खाऊ शकता.

किवी फळ
चार आठवड्यांसाठी २४ प्रौढांना झोपण्याच्या एक तास आधी किवी दिले गेले. यामुळे अंथरुणावर झोपायला लागलेला वेळ ४२ टक्क्यांनी कमी झाला. झोपण्याची वेळदेखील १३ टक्के वाढली. त्यात सेरोटोनिन केमिकल असते. हे झोपेचे चक्र नियंत्रित करते.

कधी आणि किती : झोपेच्या एक तास आधी दोन छोटे किवी खाऊ शकता. गाढ झोप येईल.

हर्बल चहा
कॅमोमाइल आणि कृष्णकमळ (पॅशन फ्लॉवर) फुलांचा चहा झोपेसाठी चमत्कार आहे. कॅमोमाइलमध्ये अॅपिजेनिन अँटिऑक्सिडंट असते. हे झोपेसाठी चांगले असते. एका अभ्यासानुसार, २८ दिवसांसाठी लोकांनी दररोज दोनदा कॅमोमाइल चहा घेतला, त्यानंतर त्यांना १५ मिनिटांत झोप आली.

कधी आणि किती : झोपण्याच्या ३० मिनिटे आधी कॅमो-माइल किंवा कृष्णकमळाचा चहा

बदाम/अक्रोड
मेंदूतील पायनल ग्रंथीमधून बाहेर पडलेले मेलाटोनिन संप्रेरक झोपेच्या चक्रावर नियंत्रण ठेवते. बदाम मेलाटोनिनचा चांगला स्रोत आहे. अक्रोडमुळे झोप चांगली लागते. पाम भरलेले बदाम आपल्या दिवसभरातील फॉस्फरसच्या १८ टक्के गरज पूर्ण करते.

कधी आणि किती : झोपण्याच्या एक तास आधी अक्रोड किंवा भाजलेले बदाम खावेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser