आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाकीपणा:मदत करणे सर्वोत्तम उपाय

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डब्ल्यूएचओनुसार, एकाकीपणा जगभरात महामारीप्रमाणे वाढत आहे. कोरोनाकाळात ही परिस्थिती बिकट झाली आहे. ऑस्ट्रेलियन ऑर्गनायझेशनच्या सायंटिफिक चेअर ऑफ एंड्युरिंग लोनलीनेसच्या मिशेल लिम म्हणतात की, एकटेपणाचे प्रत्येकासाठी समानपणे लागू होणारे कोणतेही एक सूत्र नाही. तरीही फायदेशीर ठरणारे हे काही सामान्य उपाय.

घनिष्ठ नाते बनवा
मिशेल लिम यांच्या मते, आपल्या वर्तुळात आपले किमान एक जवळचे नाते असले पाहिजे, मग ते भावंड असो, पालक असो किंवा शाळेतील मित्र असो. या बंधामुळे एकटेपणा बऱ्याच प्रमाणात कमी होतो.

इतरांना मदत करा
कोरोना महामारीच्या काळात नेक्स्ट डोअर या मासिकाने केलेल्या संशोधनात इतरांना मदत करणाऱ्या लोकांमध्ये एकटेपणा कमी असल्याचे दिसून आले. सहकार्यामुळे शरीरातील आनंदाचे हार्मोन वाढते.

पुढाकार घ्या
सेज जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, एकाकीपणाने त्रस्त असलेल्या लोकांनी इतर लोक येण्याची आणि मदत करण्याची वाट पाहू नये, तर स्वत: लोकांना भेटून वर्तुळ वाढवावे.

बातम्या आणखी आहेत...