आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंदमान-निकोबार बेटांमधील पोलिस अधिकारी जी. चित्रा त्यांच्या व्यग्र दिनचर्येतून व्यायामासाठी निश्चितपणे वेळ काढतात. त्या व्यायाम करतात आणि नंतर ड्यूटीवर जातात. वास्तविक, बेटावर पोलिसांना तंदुरुस्त करण्याची मोहीम सुरू आहे. मसालेदार करीचे पदार्थ, पनीर, समोसे व भरपूर कर्बोदकांचे डोसे पोलिसांचे सर्वात मोठे शत्रू असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. पोलिस प्रमुख सत्येंद्र गर्ग यांना अंदमान- निकोबारला संपूर्ण देशात आदर्श म्हणून सादर करायचे आहे.
२०२० मध्ये बेटांवर पोलिस प्रमुखपदी आलेल्या गर्ग यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. गैरहजर आणि मद्यसेवन करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी ४३०४ कर्मचाऱ्यांचे वजन आणि उंचीचे प्रमाण तपासले. सुमारे ५० टक्के पोलिसांचे वजन जास्त किंवा ते लठ्ठ असल्याचे आढळून आले. एक उत्तम उदाहरण मांडण्यासाठी त्यांनी सर्वात वजनदार पोलिस अधिकारी जॉनी वॉटसनकडे विशेष लक्ष दिले. १०४ किलोच्या वॉटसन यांचा आहार मर्यादित करण्यात आला आहे. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत त्याचे वजन ८५ किलोवर आले आहे.
भारतातील पोलिसांवर कामाचा खूप ताण आहे, असे गर्ग सांगतात. एका सर्वेक्षणानुसार गरजेपेक्षा ३५% कमी पोलिस अधिकारी आहेत. दररोज सरासरी कामाचे तास १४ आहेत. जास्त कामामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. अंदमानमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांशी त्यांच्या मानसिक तणावाबाबत चर्चा होते. डॉक्टरांचे एक पथक दर काही दिवसांनी त्यांच्या शरीराचे मोजमाप करते. त्यांना तणावाच्या पातळीशी संबंधित माहिती दिली जाते. या महिन्यात सेवानिवृत्त होणारे गर्ग म्हणतात की, भारतातील सर्व पोलिस ठाण्यांसाठी फिटनेस प्रोग्राम तयार करण्यासाठी त्यांना पुरेसा डेटा गोळा करायचा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.