आरोग्य / तुळशीच्या पानांचे आरोग्यदायी फायदे, रोगप्रतिकारक्षमता वाढवण्याचे काम करते

  • आयुर्वेदामध्ये तुळशीचे आरोग्यदायी गुणधर्म सांगितले आहे

दिव्य मराठी

May 15,2020 07:50:00 AM IST

आयुर्वेदामध्ये तुळशीचे आरोग्यदायी गुणधर्म सांगितले आहे. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. चला तर जाणून घेऊया तुळस आपल्यासाठी किती फायदेशीर आहे ते...

- तुळशीच्या पानात अँटिऑक्सिडंट असतात जे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक्षमता वाढवण्याचे काम करते.

- आपल्याला सर्दी, पडसे किंवा ताप आल्यास खडीसाखर, काळे मिरे आणि तुळशीच्या पानांना पाण्यामध्ये उकळून काढा करावा आणि त्याचे सेवन करावे. आपण या काढ्याचा घोळ वाळवून याच्या बारीक बारीक गोळ्या बनवून खाल्ल्यामुळे सर्दी, पडसे आणि तापामध्ये आराम मिळतो.

- तोंडाला दुर्गंधी येत असेल त्यांनी दररोज सकाळी उठल्यावर तुळशीचे पान तोंडात ठेवावे, असे केल्यास तोंडाची दुर्गंधी कमी होते.

- शरीरावर कुठेही जखम झाल्यास तुळशीच्या पानांना तुरटीबरोबर जखमेवर लावल्याने जखम लवकर बरी होते.

X