आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हेल्थ वेल्थ :कोरोना संसर्गामध्ये टर्म विम्याचे महत्त्व वाढले; तुम्ही अशी करा योग्य प्लॅनची निवड

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हेल्थ वेल्थ तुम्ही आपल्या कुटुंबासाठी उच्च सुरक्षेची तजवीज करू शकता

 सर्वसधारणपणे टर्म इन्शुरन्स नाममात्र किमतीत आपल्यानंतर आपल्या कुटुंबाला आर्थिक कवच प्रदान करते. कोरोना संकटासारख्या असामान्य परिस्थितीत याचे महत्त्व आणखी वाढले आहे. एखादा व्यक्ती पुरेसा जीवन विमा खरेदी करण्याचा विचार करत असेल तर टर्म विमा याचा उपाय आहे. कारण, हे जीवन विम्याचा सर्वात किफायतशीर स्वरूप आहे. टर्म पॉलिसीमध्ये कोणताही मॅच्युरिटी लाभ नसतो, मात्र तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षेची उच्च रकमेची गुंतवणूक करू शकता.

टर्म प्लॅन विरुद्ध पारंपरिक प्लॅन

तुम्ही सुरक्षेसोबत पैसाही गाठीशी असावा, असा विचार करत असाल तर एंडोमेंट इन्शुरन्स पॉलिसी उपयुक्त आहे. हे दोन्ही प्रॉडक्ट वेगवेगळ्या गरजा पूर्ण करतात. हा कुण्या एकाची दुसऱ्याविरुद्ध निवडण्याचे प्रकरण नाही. उलट, सध्याच्या काळात बचतीच्या तुलनेत सुरक्षा आणि पैसा बचतीच्या आवश्यकतेला प्राधान्य देतो. टर्म इन्शुरन्स सरळ आणि सर्वात किफायतशीर असतो. सध्याची स्थिती पाहता हा एक अनिवार्य पर्याय होत आहे.

टर्म विमा कुणी खरेदी केला पाहिजे

कुटुंबातील प्रत्येक कमावत्या सदस्याने कमाई सुरू झाल्याबरोबर टर्म विमा घेतला पाहिजे. कमी वयात हप्ता कमी राहतो आणि पूर्ण पॉलिसी अवधीसाठी यामध्ये कोणताही बदल असत नाही. त्यामुळे कमी हप्त्याचा लाभ उचलण्यासाठी कमी वयात तो खरेदी केला पाहिजे. कमी वयात टर्म विमा घेऊ शकत नसाल तर तुम्ही तो आताही खरेदी करू शकता.

ही पाच पावले उचलून कुटुंबाला द्या सुरक्षा कवच

  • वित्तीय गरजांचे मूल्यांकन करणे टर्म पॉलिसी कवच तुमच्यानंतर कुटुंबाच्या वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी असतो. तुम्हाला विम्याच्या रकमेचे आकलन करताना उत्पन्नाचे स्रोत, सध्याचे कर्ज आणि देणे, कुटुंबात अवलंबून असलेले सदस्य, त्यांची सध्याची जीवनशैली कायम राखण्यासाठी येणाऱ्या खर्चाशिवाय अन्य वित्तीय उद्दिष्ट, उदा. मुलांचे उच्च शिक्षण, त्यांचे लग्न, निवृत्ती आदींचा विचार केला पाहिजे.
  • परिस्थिती पाहून योग्य प्लॅनची निवड करा जीवन विमा ऑनलाइन असो की ऑफलाइन, तुम्हाला आधी सांगितलेले टर्म इन्शुरन्स प्लॅन मिळतील. प्लॅनची निवड तुमच्या कुटुंबाला सुरक्षा कवच असे हवे यावर अवलंबून आहे. आपण ज्या परिस्थितीचा सामना करत आहोत, ते पाहता आणि महागाई लक्षात घेता वाढत्या मासिक उत्पन्नासोबत जास्तीत जास्त टर्म इन्शुरन्स कव्हर खरेदी केला पाहिजे.
  • क्लेम सेटलमेंट रेश्योची तुलना करा
  • अशी विमा कंपनी निवडा, ज्याच्या दाव्याच्या पूर्ततेचे प्रमाण सर्वात चांगले असावे आणि जो तुमच्या व तुमच्या कुटुंबाला सर्वाधिक संभाव्य कव्हर प्रदान करत आहे. क्लेम सेटलमेंट रेश्यो टक्क्यांत दाखवला जातो आणि उच्च क्लेम सेटलमेंट रेश्यो कायम चांगला असतो. नेहमी ९० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणाची विमा कंपनी निवडा. टर्म विमा केवळ स्वस्त हप्त्याच्या आधारावर निवडू नका.
  • भविष्यात होणाऱ्या महागाईची गणना हवी
  • टर्म इन्शुरन्स प्लॅन खरेदी करताना तुम्हाला वय आणि अवधीची वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. महागाईमुळे तुमच्या कुटुंबातील जीवनशैलीवर परिणाम होऊ नये यासाठी उच्च विमा कव्हर घेऊ शकता किंवा विमा कंपनीला भविष्यातील महागाईविरुद्ध सुरक्षा प्रदान करण्यासाठी म्हणू शकता. लक्षात ठेवा, महागाईला महत्त्व न दिल्यास तुमच्या कुटुंबाला पुढे अडचणी येऊ शकतात.
  • कव्हर वाढवण्यासाठी रायर्डसची निवड करा
  • अनेक विमा कंपन्या ज्याचा तुम्ही विचार करत आहात,अशा टर्म प्लॅनद्वारे रायर्डसला जोडण्याचाही पर्याय देतात. यामुळे तुमच्या विमा कवचाचा सुरक्षा स्तर वाढतो. टर्म इन्शुरन्स पॉलिसीसोबत रायडर्स उदा. क्रिटिकल इलनेस(गंभीर आजार), अपघात लाभ, रायडर निवडू शकता. यामुळे तुम्हाला अतिरिक्त सुरक्षा मिळते. तज्ञ रायडर्सला एक चांगला पर्याय मानतात.
0