आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lifestyle
  • Health
  • The Price Of Edible Oil Is The Highest In 11 Years, This Price Should Not Spoil Your Budget, So Follow These Tips To Reduce The Use; News And Live Updates

महागाईचा फटका:खाद्यतेलाची किंमत 11 वर्षात सर्वात जास्त, आहारात तेलाचा जास्त वापर केल्यास होऊ शकतात हे आजार

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारत देशातील लोक आपल्या आहारात 6 प्रकारच्या खाद्यतेलाचा वापर करतात.

भारत देशात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे सर्वसामान्य माणसांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनमध्ये हाताला काम नसल्याने कित्येक लोक बेरोजगार झाले आहे. देशात पेट्रोल डिझेलसह इतर ही वस्तूंच्या किंमती दिवसेंदिवस वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या एक वर्षात खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे खाद्यतेलाच्या तेलाच्या किंमती 11 वर्षांत सर्वाधिक असल्याचे बोलले जात आहे.

एका अहवालानुसार, मोहरीच्या तेलाच्या किंमतीत सुमारे 44 टक्क्याने वाढ झाली असून 28 मे रोजी किरकोळ बाजारात त्याची किंमत 171 रुपये प्रति लीटर नोंदविण्यात आली. तर गेल्या वर्षी 28 मे रोजी एका लिटर मोहरीच्या तेलाची किंमत 118 रुपये होती. त्याचबरोबर सूर्यफूल तेलाच्या किंमतीतही 50 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

ग्राहक व्यवहार विभागाच्या वेबसाइटनुसार, गेल्या वर्षभरात या तेलांच्या किंमती 20 ते 56 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे म्हटले आहे. देशातील एक मोठी लोकसंख्या कोरोना महामारीमुळे लावलेल्या लॉकडाऊन आणि महागाईशी झुंज देत आहे. अशा परिस्थितीत खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट खराब झाले आहे.

देशात 'या' 6 खाद्यतेलाचा वापर करतात
भारत देशातील लोक आपल्या आहारात 6 प्रकारच्या खाद्यतेलाचा वापर करत असून यामध्ये मोहरीचे तेल, शेंगदाणा तेल, डालडा (वनस्पती तेल), रिफाइंड (सोया तेल), सूर्यफूल तेल (सनफ्लावर ऑयल) आणि पाम तेल यांचा समावेश आहे.

तेलाचा वापर केल्यास हे आजार होण्याची संभावना
काही लोक आहारात तेलाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. यामुळे आपल्याला किती मोठे नुकसान होणार यांची कल्पना त्यांना नसते. एका रिसर्चनुसार, आहारात जास्त खाद्यतेलाचा वापर केल्यास हृदयविकाराचा झटका, कर्करोग, मेंदूचा झटका, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, गुडघ्यात दुखणे अशा अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...