आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपण्याची स्थिती:अनेक समस्या कमी करते झोपण्याची योग्य पद्धत

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निरोगी शरीरासाठी चांगली झोप सर्वात महत्त्वाची आहे, परंतु झोपेमध्ये अनेकदा व्यत्यय येण्याची अनेक कारणे आहेत. उदा. पाठ किंवा मान दुखणे. घोरणे किंवा पोटात आम्ल जमा होणे. सामान्यपणे होणाऱ्या अशा समस्या वैज्ञानिक पद्धतींनी सोडवता येतात.

घोरत असल्यास : एका कुशीवर वा पोटावर झोपा
कुशीवर किंवा पोटावर झोपा. डोके काही इंच उंच ठेवा. असे झोपल्याने जीभ वा टिश्यू घशात चिकटत नाही. जीभ घशात अडकल्याने श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो व आपण घोरू लागतो.

आम्ल अधिक तयार झाल्यास : डोके उंच ठेवा
झोपताना डोक्याखाली उंच उशीचा वापर करा. यात काही अडचण असल्यास पलंगाखाली एक वीट टाकून डोके उंच करा. किंवा पाठीऐवजी एका कुशीवर झोपा.

मानदुखी : मानेखाली टॉवेल गुंडाळून ठेवा
पोटावर झोपणे टाळावे. मानेखाली एकापेक्षा जास्त उशा वापरू नका. उशीची उंची खांद्याच्या वर ठेवा. टॉवेल गुंडाळून ठेवल्यानेही मानदुखीमध्ये आराम मिळतो.

खांदा दुखत असल्यास : उंच उशी वापरा
आपल्या पाठीवर झोपा. एका कुशीवर झोपत असाल, तर छातीच्या उंचीएवढी उशी ठेवून दुखणारा खांदा त्यावर ठेवा. एखाद्या व्यक्तीला मिठी मारल्याप्रमाणे उशीवर दाब द्या.

पाठदुखी असल्यास : गुडघ्याखाली उशी ठेवा
पाठीवर झोपा. गुडघ्याखाली उशी ठेवा. हे मणक्याची नैसर्गिक वक्र राखते. शरीरावरील ताण कमी होतो. अधिक आरामासाठी टॉवेल कमरेच्या खाली गुंडाळून ठेवता येईल.

पायांत पेटके येणे : झोपण्यापूर्वी हे करा
झोपण्यापूर्वी पेटके येत असलेल्या भागाची मालिश करा. हलकेच स्ट्रेच करा. तथापि, वेदना कायम राहिल्यास हीटिंग पॅड वापरता येईल. याचा फायदा होईल. पेटके निघून जाईल.

लोकांच्या झोपण्याच्या सवयी ५७% लोक कुशीवर झोपतात १७% लोक पाठीवर झोपतात ११% लोक पोटावर झोपतात

बातम्या आणखी आहेत...