आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधन:काेराेना झाल्यावर पुन्हा संसर्गाचा धोका खूप कमी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेना झाल्यावर पुन्हा संसर्गाचा धोका खूप कमी आहे. डेन्मार्कमध्ये विस्तृत स्तरावर केलेल्या अभ्यासात हे समोर आले आहे. त्यानुसार कोविड-१९ मधून बरे झालेले बहुतांश रुग्ण किमान सहा महिन्यांसाठी पुन्हा संसर्गापासून सुरक्षित होतात. लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, ६५ वर्षांखालील लोकांमध्ये पुन्हा संसर्गाचा धोका ८०% कमी आहे.

वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, पुन्हा संसर्ग झाला तर लक्षणे न दिसण्याची शक्यता आहे. कारण रोगप्रतिकार यंत्रणा विषाणूला वेगाने निष्क्रिय करते. त्यामुळे पहिल्यांदा लक्षणांसह संक्रमित झालेले लोक पुन्हा संक्रमित झाले तर त्यांच्यात कुठलीही लक्षणे न दिसण्याची शक्यता आहे. पण एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे ज्यांना पुन्हा संसर्ग झाला आहे, त्यापैकी बहुतांश जणांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली नाही.

बातम्या आणखी आहेत...