आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
व्हिजिटेबल सॅलडमध्ये हिरव्या पालेभाज्यांबरोबर टोमॅटो, मशरूम, कांदा, गाजर, मिरची, काकडी, मुळा या भाज्यांचाही वापर केला जातो. हे व्हिजिटेबल सॅलड चवदार करायचे असेल तर त्यात उकडलेली अंडी आणि पनीरही वापरू शकता.
सॅलड म्हटले की, त्यात घातल्या जाणाऱ्या भाज्या कच्च्या असणे अपेक्षित असते. काही सॅलड्समध्ये शिजवलेले पदार्थ घातले जातात. पण, तरीही कच्च्या भाज्या हेच आरोग्यदायी सॅलडचे वैशिष्ट्य आहे. कांदा, टोमॅटो, काकडी, मुळा, गाजर, बीट, ढोबळी मिरची, कोबी व पालकासारख्या हिरव्या पालेभाज्या सॅलडमध्ये वापरल्या जातात. ब्रोकोली, मशरूम, सेलरी, पार्सले, बेझिल या विदेशी भाज्याही सॅलडमध्ये वापरल्या जातात. न शिजवलेल्या भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे टिकून राहतात. त्यामुळे सॅलडचे घटक जितके कच्चे तितके उत्तम. अर्थात बीट किंवा ब्रोकोलीसारख्या काही भाज्या किंवा मोड आलेली कडधान्ये सॅलडमध्ये वापरायची असतील तर ती वाफवून घ्यावीत.
सॅलड बनवल्यानंतर लगेच खावे : सॅलड बनवून लगेच सर्व्ह करावे किंवा ते लगेच खावे. नाहीतर बनवून ठेवलेल्या सॅलडला किंवा कोशिंबिरीला पाणी सुटते. कच्च्या भाज्या चिरल्यानंतर काही वेळाने खाल्ल्या तर त्यातील पोषणमूल्ये कमी होतात. सॅलडचा हवेशी संपर्क येऊन पोषणमूल्य कमी होते म्हणून ते टाळण्यासाठी भाज्या चिरतानाच मोठे तुकडे करावेत.
कोरोना काळजी : फ्रिजमध्ये ठेवलेल्या भाज्या थेट काढून सॅलड बनवू नये. ताज्या भाज्यादेखील नीट धुवूनच वापराव्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.