आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lifestyle
  • Health
  • The Stress Of The Office Also Reduces The Chances Of Catching A Cold, Walking At Lunch Time Also Reduces Stress

ऑफिसचा ताण:ऑफिसच्या ताणामुळेही सर्दी-पडशाची शक्यता, लंच टाइममध्ये चालल्यानेही कमी होतो तणाव

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

ऑफिसचा ताण कमी करण्याच्या चार प्रभावी पद्धती

दिवसाची योग्य सुरुवात : तणाव हाताळणे सुलभ
दिवसाची सुरुवात नियोजनानुसार, योग्य पोषण आणि दृष्टिकोनाने झाली तर कामाच्या ठिकाणी येणारा ताण चांगल्या प्रकारे हाताळला जातो.

जेवणाच्या वेळी चालणे : फील गुड हार्मोन स्रवेल वेब एमडीच्या मते, जेवणाच्या वेळी चालण्याने पचन सुधारते, तर डोपामाइन फील-गुड हार्मोन सोडले जाते, त्यामुळे तणाव कमी होतो.

हेल्दी स्नॅक्स घ्या : थकवा, तणाव कमी होईल हार्वर्ड इन्स्टिट्यूटच्या मते, कामाचा थकवा आल्यानेही तणाव वाढतो. २ ते ३ तासांच्या अंतराने हेल्दी स्नॅकिंग ऊर्जा प्रदान करून थकवा कमी करते.

बॉडी स्कॅनिंग :
- मनात शरीराचे स्कॅनिंग करा. आपल्याला कसे वाटते याकडे, विशेषत: जेथे स्नायू तणावग्रस्त असतात तिथे विशेष लक्ष द्या.
- आता नाकाने सावकाश श्वास घेताना पायाचे स्नायू शक्य तितके ताणून घ्या. १० पर्यंत मोजा. आता आरामात हळूहळू श्वास सोडा.
- अशा प्रकारे पायांच्या नडग्यांवर दबाव आणत १० पर्यंत मोजा आणि आरामात हळूहळू श्वास सोडा. असे पूर्ण शरीरावर करा.