आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१. इटालियन पद्धतीने पास्ता खा
२०२१ मध्ये अमेरिकन हार्ट असोसिएशनने आहार मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. लोकांच्या आवडी-निवडीवर समितीने भर दिला आहे. उदा. एखाद्याला पास्ता खाण्यास मनाई करू नका, कारण त्यात रिफाइन्ड कार्बोहायड्रेट्स असतात. त्याऐवजी इटालियन पद्धतीने पास्ता खाण्यास सांगा - जेवणाच्या सुरुवातीला थोड्या प्रमाणात.
२. अन्न म्हणजे मानसिक आरोग्य
कोविडमध्ये तणाव, नैराश्य आणि चिंता जास्त होती तेव्हा लोक आइस्क्रीम, पेस्ट्री, पिझ्झा इ. त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थांकडे वळले. परंतु, अभ्यासातून दिसून आले की, तणावाच्या काळात आपण खूप गोड खातो, याचा मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होत नाही.
३. प्रक्रिया केलेले अन्न टाळा
पौष्टिक-समृद्ध अन्न फायदेशीर सूक्ष्मजंतूंच्या वाढीस प्रोत्साहन देतात, तर डबाबंद आणि प्रक्रिया केलेले पदार्थ हानिकारक असतात. जास्त प्रक्रिया केलेले अन्नाची सवयही लागू शकते.
४. आठ ग्लास पाणी गरजेचे नाही
शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी अनेक घटक जबाबदार असतात. उदा. आपल्या शरीराचा आकार, बाहेरचे तापमान, आपण श्वास कसा घेतो, किती घाम येतो इ. हायड्रेटेड राहण्यासाठी तरुण तहान लागल्यावर पाणी पिऊ शकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.