आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगभरातील महामारी, झपाट्याने बदलणारी परिस्थिती आणि अशांतता असूनही बौद्ध भिक्खू स्वतःला कसे शांत ठेवू शकतात? या प्रश्नाचे उत्तर बौद्ध भिक्खू आणि ‘डोंट वरी’ या पुस्तकाचे लेखक सुनम्यो मासुनो यांनी दिले आहे. चार गोष्टींचा नित्यक्रमात समावेश केल्यास शरीर उत्साही राहून मन शांत ठेवता येते, असे मासुनो म्हणतात.
*३० मिनिटे लवकर उठा
खूप लवकर उठण्याचा प्रयत्न करू नये. यामुळे दबाव जाणवेल. आपल्या रोजच्या उठण्याच्या वेळेच्या फक्त ३० मिनिटे आधी उठावे.
*१० मिनिटे सफाई करा
सकाळची पहिली १० मिनिटे स्वच्छता आणि साफसफाईसाठी द्या. ही साफसफाई कुठेही होऊ शकते. बागेची सफाई करा. घराचा कोणताही भाग स्वच्छ करा.
*२० मिनिटे ध्यान
फक्त २० मिनिटांचे ध्यान मन आणि शरीरात ऊर्जा प्रसारित करते. सकाळी ध्यान केल्याने दिनचर्येची दिशा ठरवण्यात मदत होते. यामुळे आपण एकाग्र, शांत आणि संतुलित झाल्याचे अनुभवतो.
*श्वासोच्छ्वासाचे तंत्र
बौद्ध धर्मानुसार, नाभीच्या काही सेंटिमीटर खाली एक टँडन पॉइंट आहे. जिथे बसल्यावर पोट वळते अशी ही जागा आहे. या बिंदूवर लक्ष केंद्रित करताना हळूहळू श्वास सोडा. डोळे किंचित सुमारे ४५ अंशांवर झुकवा. यामुळे अस्वस्थ मन लवकर शांत होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.