आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकिल्ली, पाकीट, टीव्हीचा रिमोट कुठे तरी ठेवून ते शोधावे लागत असल्यास स्मरणशक्ती कमकुवत होत आहे, असे वाटत असेल तर चुकीचे ठरू शकते. अॅबसेंट माइंडमुळे आपण बहुतांश गोष्टी विसरतो. हे लक्ष आणि स्मृती यांच्यातील एक विघटन आहे, तिथे आपले लक्ष विसरणाऱ्या गोष्टीवर नव्हे, तर दुसरीकडे कुठे तरी असते. या दरम्यान आपण वस्तू ठेवतो तेव्हा मेमरीमध्ये ती माहिती एन्कोड करू शकत नाही.
अॅबसेंट माइंडमुळे होते विस्मरण
१. ठिकाणाची थोड्या मोठ्याने पुनरावृत्ती करा
अशी वस्तू ठेवताना त्या ठिकाणाची जरा जोरात पुनरावृत्ती करा. उदा. किल्ली टेबलावर ठेवली आहे किंवा पाकीट ड्रॉवरमध्ये ठेवले आहे. याची मनातही पुनरावृत्ती करता येईल. असे केल्याने लक्ष त्या ठिकाणी जाते. आणि त्याची आठवण राहते.
२. जास्त विस्मरण होणाऱ्या ठिकाणाचे फोटो काढा
मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातील मानसशास्त्र आणि मेंदूविज्ञानाच्या निवृत्त प्राध्यापक सुसान व्हिटबॉर्न यांच्या म्हणण्यानुसार, जिथे बहुतांश गोष्टींचे विस्मरण होते अशा ठिकाणांचे मोबाइलमध्ये फोटो घ्या. पुढच्या वेळी एखादी गोष्ट विसरलात आणि ती सापडत नसेल तेव्हा मोबाइलमधील ती छायाचित्रे पाहा. त्यावरून सहज लक्षात येईल.
३. वस्तूंना आवडते रंग द्या
मरीन डेनिसच्या म्हणण्यानुसार, आपण एखादी गोष्ट शोधतो तेव्हा पहिली नजर आवडत्या रंगाकडे जाते. अशा परिस्थितीत आपण आपल्या आवडत्या रंगाचे की-चेन किल्लीला लावू शकतो. आवडत्या रंगाचे फोन कव्हर मोबाइलवर लावू शकतो. टीव्हीच्या रिमोटवर रिफ्लेक्टिव्ह टेप लावू शकतो.
४. तंत्रज्ञानाचा अवलंब करा
फॉब हे एक छोटे उपकरण आहे. बटण दाबल्यावर ते कंप पावते. ते किल्लीला लावता येते किंवा पाकिटातही ठेवता येते. दुसऱ्या फॉबचे बटण दाबल्यावर यात कंपने सुरू होतील. मोबाइल अॅपद्वारेही त्याचा वापर करता येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.