आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामन अशांत असेल, लवकर राग येत असेल तर १० मिनिटे श्वासोच्छ्वास आणि योगासने यामुळे आराम मिळू शकतो. प्लाॅस वन रिसर्च जर्नल मध्ये प्रकाशित संशोधनानुसार, १० मिनिटांचा व्यायाम उच्च-तीव्रतेच्या मध्यंतर प्रशिक्षणाच्या एका मिनिटाशी जोडला गेला तर हृदय-चयापचय आरोग्यामध्ये म्हणजेच हृदयाच्या कार्यामध्ये ४५ मिनिटांच्या मध्यम व्यायामाच्या बरोबरीने सुधारणा होते. सेलिब्रिटी ट्रेनर स्टेफनी मन्सूर यांच्या म्हणण्यानुसार, हे दोन योग मणक्याला वळण देतात. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात.
सीटेड कैट काऊ पोज असे करा : आरामदायी स्थितीत खुर्चीवर बसा. आपले दोन्ही हात पायांवर ठेवा. आता कंबर सरळ करा. आता श्वास सोडताना पोट आतल्या बाजूला खेचा. शक्य तितके डोके खाली वाकवण्याचा प्रयत्न करा. शरीर वाकवताना खुर्चीला पाठ टेकवा. त्याच प्रकारे श्वास घेताना डोके सरळ करून वरच्या दिशेने हलवा. छाती पुढे आणा. कमरेपासून वक्र तयार करण्याचा प्रयत्न करा. या दरम्यान सामान्य गतीने श्वास घ्या. हे ८ ते १० वेळा पुन्हा करा.
सीटेड ट्विस्ट असे करा : पाय पसरून बसा. पाठीचा कणा सरळ करा. डावा पाय वाकवून उजव्या गुडघ्यावर आणा आणि जमिनीवर ठेवा. आता उजवा पाय वाकवून डाव्या नितंबाजवळ ठेवा. आता उजव्या हाताचे कोपर डाव्या गुडघ्यावर ठेवा. छताच्या दिशेने बोटे सरळ करा. डावा हात मागे ठेवा. श्वास सोडताना क्षमतेनुसार धड आणि मान वाकवून डाव्या खांद्यावर लक्ष केंद्रित करा. ३० ते ६० सेकंद या स्थितीत राहा. आता दुसऱ्या बाजूला पुन्हा असेच करा.
श्वास घेण्याचे ४-४ तंत्र : आरामदायी स्थितीत बसा. आता नाकातून श्वास घेताना ४ पर्यंत मोजा. ४ च्या मोजणीपर्यंत श्वास रोखून ठेवा आणि नंतर नाकाने हळूहळू श्वास सोडा. हे ८ ते १० वेळा पुन्हा करा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.