आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांगल्या सवयी:स्मृतिभ्रंशाचा धोका 35% कमी करतात या सवयी

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्मृतिभ्रंश झालेल्या व्यक्तीची केवळ स्मरणशक्तीच कमकुवत होत नाही, तर मेंदूची समन्वय साधण्याची क्षमता कमी होते, त्यामुळे पीडित व्यक्तीला अनेक अडचणी येऊ लागतात. २४ पेक्षा जास्त अभ्यासांवर लॅन्सेटने केलेल्aसून आले की, दैनंदिन कामांत काही बदल केले तर त्याचा धोका ३५% ने कमी होऊ शकतो.

असा कमी करा धोका
-श्रवण क्षमतेचा थेट संबंध
: कमी ऐकू येण्यामुळे व्यक्ती सामाजिक मिसळण्यास कचरते. अशा वेळी मेंदूची समन्वय क्षमता कमी होते. परिणामी स्मरणशक्ती कमी होऊ लागते.
-रक्तदाब संतुलित ठेवा : रक्तदाब कमी- जास्त असल्यास हृदयाच्या काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो, त्यामुळे फ्री रॅडिकल्स वाढू लागतात. यामुळे तणाव आणि जळजळ वाढते, त्यामुळे न्यूरॉन्सचे नुकसान होते. त्यामुळे मेंदूच्या क्षमतेवर परिणाम होतो.
-मधुमेहावर नियंत्रण ठेवा : वाढलेला मधुमेह नियंत्रणात न राहिल्यास तो मेंदूपर्यंत पोहोचू लागतो, त्यामुळे पेशींचे नुकसान होते.

बातम्या आणखी आहेत...