आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिलांशी संबंधित:हार्ट अटॅकची ही लक्षणे केवळ महिलांमध्ये दिसतात

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शास्त्रज्ञांचा हृदयविकाराच्या झटक्याबाबत दावा आहे की

अमेरिकेच्या क्लीव्हलँड क्लिनिक मेडिकल सेंटरमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, छातीत दुखण्याशिवाय इतरही अनेक लक्षणे हृदयविकाराच्या झटक्यात फक्त महिलांमध्ये दिसतात. या लक्षणांकडे सतत दुर्लक्ष करू नये.

१. पाठ, मान, जबडा आणि हात दुखणे
हृदयविकाराच्या झटक्याला मुख्यतः छातीत किंवा डाव्या हातातील वेदनांशी जोडून पाहिले जाते, परंतु महिलांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यात मान आणि जबड्यातही वेदना होऊ शकतात. या वेदना तीव्र किंवा सतत असू शकतात.
२. श्वसनाला त्रास आणि चक्कर येणे
हृदयविकाराचा झटका येताना धाप लागणे हे सर्वात सामान्य लक्षण आहे. तज्ज्ञांच्या मते, जणू मॅरेथॉन शर्यत पूर्ण करून आलो आहेत, असे या वेळी वाटते. त्या व्यक्तीला चालणेही मुश्कील होते.
३. तीव्र पोटदुखी किंवा पोटाचा आजार
ओटीपोटात किंवा त्याभोवती जास्त असामान्य दबाव जाणवला असेल तर हृदयरोग तज्ज्ञाशीही संपर्क साधावा.
४. छातीत दबाव आणि वेदना
छातीत दुखणे, अस्वस्थता, जळजळ आणि दबाव जाणवत असेल तर ते हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते
५. थंड घाम येणे
हृदयविकाराच्या झटक्यात स्त्रियांना मोठ्या प्रमाणावर थंड घाम येतो, असे अनेक वेळा आढळते. कधी कधी तणावानेही असे घडते. अचानक थंड घाम आल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.
..६. विश्रांतीनंतरही थकवा जाणवणे
बराच वेळ विश्रांती घेतल्यानंतरही तुम्हाला खूप थकल्यासारखे वाटत असेल तर ते हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते.