आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपण दिवसातून सुमारे २५,००० वेळा श्वास घेतो. परंतु, तज्ज्ञ म्हणतात की, बहुतांश लोक चुकीच्या पद्धतीने श्वास घेतात. श्वास एक तर खूप वेगवान असतो किंवा मंद. सामान्य स्थितीत प्रति मिनिट श्वासांची संख्या १२ ते २० असावी. विश्रांतीच्या स्थितीत ती प्रति मिनिट पाच ते सात असू शकते. आपली श्वास घेण्याची पद्धत कशी असावी ते जाणून घेऊया-
१. श्वास घेण्याचा ४-४-८ पॅटर्न
चिंतित आणि घाबरलेले असल्यास वापरा ही पद्धत
काय करावे : चार अंक मोजा आणि श्वास घ्या. नंतर चार मोजा आणि या दरम्यान श्वास आत धरून ठेवा. यानंतर आठपर्यंत मोजत असताना हळूहळू श्वास सोडा.
फायदा : अनेक अध्ययनांत आढळले की, श्वास घेण्याच्या तुलनेत तो बाहेर सोडण्याची गती आणि वेळ मर्यादा जास्त ठेवल्यास हृदयगती लवकर सामान्य होऊ लागते. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. खरं तर आपल्या शरीरालाही नैसर्गिकरीत्या श्वास सोडण्याचा वेग कमी करायचा असतो. संतुलित श्वासोच्छ्वासाने मन शांत होते आणि ब्रीदिंग पॅटर्न रिसेट होतो.
२. एका नाकपुडीने श्वास घेणे
यामुळे शरीर आणि मेंदूमध्ये संतुलन राहते
काय करावे : उजवी नाकपुडी बंद करा. यानंतर चार अंक मोजत डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या. आता डावी नाकपुडी बंद करा आणि चारपर्यंत मोजत उजव्या नाकपुडीतून श्वास सोडा. ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा करा.
फायदा : यामुळे शरीर आणि मेंदू दोन्हीच्या कार्यामध्ये संतुलन राहते. फोकस, मानसिक स्पष्टता आणि शांतता येते. उजवी नाकपुडी आपल्या सहानुभूती प्रणालीशी संबंधित आहे. डाव्या नाकपुडीचा संबंध शांत करणाऱ्या पॅरासिम्पेथेटिक प्रणालीशी असतो. तुम्ही दोन्ही नाकपुड्यांमधून वारंवार श्वास घेण्याचा आणि श्वास सोडण्याचा हा व्यायाम करता तेव्हा ते गोंधळलेल्या विचारांना लयीत आणते. त्यामुळे मन एकाग्र होते. लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.
3. बॉक्स ब्रीदिंग
मेंदू सतर्क होतो, ऊर्जा वाढते
काय करावे : चार अंक मोजत श्वास घ्या. नंतर चार मोजत श्वास रोखून धरा. यानंतर चारपर्यंत मोजत श्वास सोडा. नंतर चार अंक मोजत श्वास रोखून धरा.
फायदा : श्वास घेणे, तो रोखून ठेवणे आणि तो बाहेर सोडण्याची वेळ समान करून तुम्ही श्वास स्थिर लयीत आणता. या पॅटर्नचा फायदा असा आहे की तुम्ही पूर्णपणे रिलॅक्स स्थितीत जाण्याऐवजी जागृत व्हाल आणि अधिक ऊर्जा जाणवेल. यामुळे सर्जनशीलता वाढते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.