आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहॉलीवूड अभिनेता अरनॉल्ड श्वार्झनेगर म्हणतो की, दिवसातून १५ मिनिटेही शरीराला दिली तर माणूस स्वत:ला तंदुरुस्त ठेवू शकतो. यासाठी मेटाबॉलिक रेझिस्टन्स ट्रेनिंग (एमआरटी) हे सर्वोत्तम आणि जुने सूत्र असल्याचा त्यांचा दावा आहे. यामध्ये ६ व्यायाम एका क्रमाने ३० सेकंदांच्या ठराविक मध्यंतरासह करावे लागतात.
एकूणच तंदुरुस्ती मिळवून देतात हे व्यायाम
बॉडी वेट स्क्वॅट : ८ ते १० वेळा
कसे करावे : आपले हात सरळ समोर करा. खांद्याच्या रुंदीएवढे पाय पसरवा, पायाची बोटे थोडीशी बाहेर ठेवा. आता शक्य होईल तितक्या खाली स्क्वॅटच्या स्थितीत जा.
पुशअप्स : ५ ते ८
कसे करावे : आपल्या खांद्याच्या रुंदीएवढे हात पसरून शरीर जमिनीवर सरळ करा. आता छातीला जमिनीपासून सुमारे एक इंच अंतरावर न्या. मागील स्थितीकडे परत या.
प्लँक : १५ सेकंद होल्ड करा
कसे करावे : पुशअपच्या स्थितीत आपले हात वाकवा आणि कोपरांवर शरीर टेकवा. हात जमिनीला समांतर ठेवा. शरीर शक्य तितके सरळ ठेवा.
जंपिंग जॅक : १५ वेळा
कसे करावे : हवेत थोडी उडी मारून पाय पसरवत असताना दोन्ही हात वरच्या दिशेने जोडावेत. मग त्याच प्रकारे उडी मारून सामान्य स्थितीत या.
रिव्हर्स लंजेस : एका पायाने ६ वेळा
कसे करावे : पाय थोडे पसरवून उभे राहा. आता एक पाय मागे घेत असताना गुडघ्याला जमिनीला स्पर्श करा. आता उभे असताना पहिल्या पायावर जोर देऊन सामान्य स्थितीत या. या दरम्यान शरीर सरळ ठेवा. आता दुसऱ्या पायाने पुन्हा असेच करा.
लाइंग हिप रेज : १० वेळा करा
कसे करावे : जमिनीवर झोपा. आता आपले पाय वाकवा, पायाच्या बोटांवर जोर देताना शरीर सरळ रेषेत येईपर्यंत नितंब हळूहळू वर करा. आपले खांदे जमिनीवर ठेवा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.