आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य:हे आहे आरोग्यदायी आहाराचे सूत्र! फळे-भाज्यांनी भागवा अर्धी भूक

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात १-७ सप्टेंबर या काळात राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जात आहे. योग्य आहारामुळे मुलांच्या वाढीस मदत होते, तर लठ्ठपणा, हृदयरोग, टाईप -२ मधुमेहासह अनेक प्रकारच्या कर्करोगांचा धोकाही तरुणांमध्ये कमी होतो. एका आकडेवारीनुसार, अमेरिकेत २ ते १९ वर्षे वयोगटातील १९% आणि ४० पेक्षा जास्त वयाचे ४०% लोक लठ्ठ आहेत, त्यामुळे टाइप-२ मधुमेह, कर्करोग यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, १९९० ते २०१७ दरम्यान १९५ देशांत केलेल्या अध्ययनात आढळले की, जगभरात दर पाचपैकी एक मृत्यू चुकीचा आहार व त्याच्याशी संबंधित आजारांमुळे झाला आहे. मग योग्य आहार कोणता, असा प्रश्न पडतो. विज्ञान सांगते की, आहारात फळे आणि भाज्यांचे दोन भाग, तर उर्वरित एकेक भाग प्रथिने आणि कार्बोहायड्रेट अन्नपदार्थांचे घेत असाल तर ही आदर्श स्थिती आहे. याचा अर्थ असा की, आपली अर्धी भूक फळे व भाज्यांवर शमवली पाहिजे.

चुकीच्या आहारामुळे ३ आजारांचा धोका
हृदयरोग

अनारोग्यकारक आहारामुळे होणाऱ्या हृदयरोगाचे सर्वात मोठे कारण म्हणजे सोडियम वा मिठाचे जास्त प्रमाण. उच्च सोडियमच्या सेवनाने रक्तदाब (उच्च रक्तदाब) वाढतो. यामुळे रक्तवाहिन्यांचेही नुकसान होते. त्यामुळे हृदयाची समस्या उद्भवू शकते.

मधुमेह
शरीरात अन्नाचे साखरेत रूपांतर होते. त्याचा उपयोग शरीर ऊर्जा म्हणून करते. गोड पदार्थ शरीरात वेगाने शोषले जातात, त्यामुळे शरीरातील साखरेची पातळी वर-खाली होते. सध्या साखरयुक्त पदार्थांचा वापर वाढला आहे. ते मधुमेहाचे प्रमुख कारण ठरत आहे.

कॅन्सर
सूक्ष्म पोषक घटकांचे अर्थात प्रथिने, चरबी आणि कर्बोदकांचे योग्य संतुलन निरोगी शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंडानुसार चिप्स, बर्गर, चॉकलेट, बिस्किटे इ. उच्च चरबीयुक्त आणि साखरयुक्त पदार्थांच्या सेवनाने शरीरातील चरबी वाढते. लठ्ठपणामुळे १२ प्रकारचे कर्करोग होतात, असे संशोधनांत आढळले आहे.

निरोगी आहारासाठी २:१:१ चे सूत्र
एकूण जेवणातील ५०% भाग म्हणजे २ भाग फळे आणि भाज्यांचा असावा. ते शरीराला सर्व आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे, आहारातील फायबर आणि पोषक घटक प्रदान करतात. याव्यतिरिक्त, जेवणात २५% कर्बोदके असावीत. कर्बोदके शरीराला ग्लुकोज पुरवतात, ते शरीरात ऊर्जा म्हणून काम करते. यामुळे शरीराच्या संचालनासाठी ६०% ऊर्जा मिळते. उर्वरित २५ टक्के आहारा प्रथिने असलेल्या पदार्थांचा घेतला पाहिजे.

डॉ. देबजानी बॅनर्जी
ईएसपीएन क्वालिफाइड रेनल अँड ऑन्को न्यूट्रिशन एचओडी, डायटेटिक्स

बातम्या आणखी आहेत...