हेल्थ / चेहऱ्याला स्पर्श करणे अशाप्रकारे टाळू शकता

  • एक तासात १५ पेक्षा जास्त वेळा तुम्ही चेहऱ्याला स्पर्श करतात...

दिव्य मराठी

Mar 22,2020 12:10:00 AM IST

एक तासात १५ पेक्षा जास्त वेळा तुम्ही चेहऱ्याला स्पर्श करतात...

> चेहऱ्याला स्पर्श केल्याने विषाणूंची संसर्ग वाढण्याची दाट शक्यता असते.

> डोळे आणि तोंडातून विषाणू शरीरात सहजपणे प्रवेश करतात.

> संशोधनानुसार, अनेक लोक सहसा एका तासात १६ पेक्षा जास्त वेळा चेहऱ्याला स्पर्श करतात.

> तज्ञ सांगतात की, हातमोजे घालून चेहऱ्याला स्पर्श केल्यास धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो.

> हात चेहऱ्याला न लावण्याची शरिराला सवय लावा.

> घरात जागो-जागो नोट्स लावू शकतात. ज्या तुम्ही वेळोवेळी बघू शकतात.

> तुमच्या हातांना सतत व्यस्त ठेवा. घरात टीव्ही बघत असाल तर अशावेळी कपड्यांची घडी घाला, मेल तपासा किंवा इतर कुठलेही काम करा.

> सुगंधी हँडवॉश आणि सुगंधी हँड सॅनिटायझरचा वापर केल्याने तुम्हाला चेहऱ्यापर्यंत हात न्यायचा नाहीये, हे लक्षात राहील.

> डोळ्यांना पुन्हा पुन्हा हात लावत असाल तर घरातही सनग्लासेस घालू शकतात.

> घरातही मास्कचा वापर केला तर , चेहऱ्याला हात लावणे टाळू शकतात.

> हातांवर बसून या सवयीला आळा घालू शकतात.

> तुमचे सनग्लासेस नाकावर येत असतील तर हेअरटायचा वापर करा.

> नखे खाण्याची सवय असल्यास बोटांवर बँडेज लावू शकतात.

X