आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउठक-बैठक करणे ही शिक्षा असेल तर पुन्हा विचार करा. कारण हा एक सुपर ब्रेन योग आहे. याला तमिळमध्ये थोपूकरनम पोझ म्हणतात. योग इन्स्टिट्यूट, मुंबईचे संचालक हंसाजी जयदेव योगेंद्र यांच्या मते, यामुळे एकाग्रता तर वाढतेच पण मेंदूची क्षमताही वाढते. यामुळे संपूर्ण शरीराला फायदा होतो आणि मेंदु तल्लख होतो.
तीन स्टेपमध्ये अशी ही करा मुद्रा स्टेप-1 : पाय पसरून उभे राहा. जीभ टाळूला लावा. स्टेप-२ : आता डाव्या हाताने उजव्या कानाचा खालचा भाग धरा. अंगठा समोर आणि पहिले बोट कानाच्या मागे ठेवा. उजव्या कानाचा खालचा भाग मेंदूच्या डाव्या बाजूला प्रभावित करतो. त्याचप्रमाणे डाव्या कानाचा खालचा भाग उजव्या हाताने धरा. त्याचा मेंदूच्या उजव्या बाजूवर परिणाम होतो. स्टेप-३ : आता कान याच स्थितीत धरुन १० ते १२ वेळेस उठक-बैठक करा. बसताना नाकाने श्वास घ्या तर उठताना तोंडाने श्वास सोडा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.