आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नॉलेज:15 मिनिट उन्हाचे तीन मोठे फायदे

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपले शरीर सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यानंतर आपोआपच ड जीवनसत्त्वाची निर्मिती करते. हार्वर्ड हेल्थ फाउंडेशनच्या एका अहवालानुसार, रोज १५ मिनिटे उन्हात गेल्यावर ड जीवनसत्त्वाची गरज पूर्ण होते. ते मेंदूत तयार होणाऱ्या सेरोटोनिन हार्मोनचे प्रमाण वाढवण्यास मदत करते. यामुळे तणाव कमी होतो, ऊर्जा आणि एकाग्रता वाढते, चांगली झोप लागते आणि पचनक्रिया सुधारते. पण किती वेळ सूर्यप्रकाशात घालवतो यासह स्थान, त्वचेच्या रंगासह अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात.

व्हिटॅमिन-डी चे फायदे
- मल्टिपल स्क्लोरोसिस
: जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशननुसार, ड जीवनसत्त्व मल्टिपल स्क्लोरोसिस या आजाराचा धोका कमी करते.

- हृदयविकार: पबमेड सेंट्रल नुसार, हृदयाशी संबंधित आजाराचा धोका कमी होतो.

- फ्लू : अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशननुसार, ते फ्लूचा धोकाही कमी करते.

बातम्या आणखी आहेत...