आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रत्येक जण कधी ना कधी घोरतो, परंतु काही वेळा हे गंभीर शारीरिक समस्येचे लक्षणही असू शकते. मेयो क्लिनिकच्या मते, श्वासोच्छ्वासाच्या वेळी घशातील सैल ऊतींमधून हवा जाते तेव्हा घोरणे उद्भवते, यामुळे ऊती कंप पावतात. यातून अनेक प्रकारचे कर्कश आवाज येऊ लागतात. अमेरिकेतील न्यूयॉर्क सिटी येथील वेल कॉर्नेल मेडिसिन येथील झोपेचे तज्ज्ञ डॉ. डॅनियल बॅरॉन यांच्या मते, व्यक्तीला झोपेचा विकार नसेल तर या चार पद्धतींचा वापर करून घोरणे बऱ्यापैकी टाळता येते.
नोज ब्रीदिंग स्ट्रिप्स : ही छोटी पट्टी नाकातून आत घेतलेल्या हवेचा प्रवाह सुधारण्यासाठी नाकावर चिकटवली जाते. वास्तविक, सामान्य स्थितीत झोपताना नाकातून हवेचा मोठा प्रवाह जातो. तो घशातून जिभेवरून फुफ्फुसापर्यंत पोहोचतो. नाकाने श्वासोच्छ्वासात काही अडथळा आल्यास हा प्रवाह बिघडतो, यामुळे घशावर परिणाम होतो आणि घोरणे सुरू होते.
माउथ गार्ड : हे एक साधे उपकरण आहे. याचा उपयोग घशातील हवेचा प्रवाह सुधारण्यासाठी केला जातो. वास्तविक, जीभ आणि घशाची ऊती खूप सैल होते तेव्हाच हवेच्या प्रवाहात अडथळा येतो, यामुळे घोरणे होते. माउथ गार्ड खालच्या जबड्याला किंचित पुढे नेते, यामुळे हवा वाहून जाणे सोपे होते.
कुशीवर झोपणे : पीठ पाठीवर झोपल्यावर गुरुत्वाकर्षणामुळे श्वासोच्छ्वासाला आधार देणाऱ्या घशातील ऊती खाली खेचल्या जातात, यामुळे श्वासोच्छ्वासात अडथळा निर्माण होतो. जास्त हवा ऊतींना मारते तेव्हा घोरणे उद्भवते. कुशीवर झोपल्याने ऊती योग्य स्थितीत राहते, यामुळे हवेचा प्रवाह सामान्य राहतो.
धूम्रपान आणि अल्कोहोल टाळा : अल्कोहोलमुळे घशाच्या जवळच्या ऊती अधिक शिथिल होतात. त्याच वेळी सिगारेट किंवा इतर धूम्रपानामुळे घशाच्या जवळील ऊती कडक होऊ लागतात, यामुळे घोरणे वाढते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.