आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्रत्येकाच्या किचनमध्ये टोमॅटो हा असतोच. टोमॅटोचा वापर भारतातच नाही, तर जगभरात होतो. भाजी आणि अनेक खाद्यपदार्थांत टोमॅटोचा उपयोग होतो. शिवाय पदार्थाला चांगली चव येण्यासाठी टोमॅटोचा उपयोग होतो.
> टोमॅटो रोज खाल्ल्यानं वजन कमी होते.
> हाडांच्या बळकटीसाठी टोमॅटो फार उपयोगी पडतात.
> डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी टोमॅटो उपयोगी ठरतात.
> टोमॅटोचा ज्यूस पिल्यानं शरीराला ऊर्जा मिळते.
> टोमॅटोचं सेवन हाय बीपीने त्रस्त असलेल्या लोकांसाठीही फायदेशीर आहे.
> मानसिक आणि शारीरिक विकासासाठी टोमॅटोचा उपयोग होतो.
> हृदयरोगांमध्येही टोमॅटो ज्यूसचं सेवन करणे फार गुणकारी असते.
> टोमॅटोने फॅट्सही वाढत नाहीत.
> टोमॅटोमुळे डोळ्यांना होणारा रातांधळेपणाही कमी होतो.
> लहान मुलांच्या पोटात जंत झाल्यास सकाळी रिकाम्या पोटी काळी मिरी घालून टोमॅटो ज्यूस पिल्यास फायदा होतो.
> टोमॅटोमध्ये लायकोपीन भरपूर प्रमाणात आढळते, त्यामुळे कॅन्सर रोखण्यास फायदेशीर ठरते.
> टोमॅटोमध्ये पाणी आणि फायबरची मात्रा जास्त असते. त्यामुळे पोट लवकर भरते आणि फॅट्सही वाढत नाहीत.
टोमॅटोचे तोटे (Side Effects Of Tomato)
> टोमॅटोच्या बियांमुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता असते.
> टोमॅटोचे जास्त सेवन केल्याने अॅसिडिटी होऊ शकते.
> टोमॅटोच्या जास्त सेवनाने पोटात दुखणे आणि गॅसचा त्रासही होऊ शकतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.